Bhandara Accident News: लग्नघरावर काळाचा घाला! वऱ्हाडाच्या व्हॅनला ट्रकची धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू

Bhandara Road Accident: भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ येथे लग्नाची वरात आटोपून परतणाऱ्या मारोती व्हॅनला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 4 महिला आणि 1 पुरुषाचा जागीच मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभय भुते, भंडारा

Bhandara News: आनंदात असलेल्या एका कुटुंबावर नियतीने घाला घातला आहे. पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथून लग्नाचे कार्य आटोपून आपल्या गावी अड्याळकडे परतणाऱ्या वऱ्हाडींच्या व्हॅनला एका भरधाव अज्ञात ट्रकने भीषण धडक दिली. या अपघातात 5 जणांचा अंत झाला असून मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ येथील एक कुटुंब लग्नासाठी कोंढा कोसरा येथे गेले होते. लग्नाचा सोहळा आटोपून सर्वजण व्हॅनने आपल्या घरी परतत होते. अड्याळ गावाजवळ पोहोचले असता, भंडारा बाजूकडून पवनीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव अज्ञात ट्रकने त्यांच्या व्हॅनला समोरून जोरदार धडक दिली. 

Advertisement

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यामध्ये 4 महिला आणि 1 पुरुष जागीच ठार झाले. अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. व्हॅनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक तरुणांनी मोठी मदत केली.  या प्रकरणी फरार ट्रक चालकाविरोधात अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 

Topics mentioned in this article