जाहिरात

Ujani Dam : उजनी धरण 76.27 टक्के क्षमतेने भरलं, भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला

आज सकाळी 10 वाजल्यापासून उजनी धरणात 31 हजार 600 क्युसेक दाबाने विसर्ग करण्यात येत आहे.

Ujani Dam : उजनी धरण 76.27 टक्के क्षमतेने भरलं, भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला

पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात शुक्रवारी 20 जून रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून 16 दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिस्थितीनुसार हा विसर्ग कमी जास्त करण्यात येत आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून उजनी धरणात 31 हजार 600 क्युसेक दाबाने विसर्ग करण्यात येत आहे.

आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 26 हजार 600 क्युसेक दाबाने विसर्ग सुरू होता. त्यानंतर आज सकाळी दहा वाजता हा विसर्ग 31 हजार 600 क्युसेक इतका करण्यात आला आहे. सध्या उजनी धरणाच्या 16 दरवाज्यातून भीमा नदी पात्रात हा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. तर दुसरीकडे दौंड बंधाऱ्यामधून उजनी धरणात 13 हजार 353 क्युसेक इतक्या दाबाने प्रवाह येत आहे.

Rain Update : मुंबईत 2 दिवस मुसळधार, पुण्यातही अतिवृष्टी; पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये धो धो बरसणार!

नक्की वाचा - Rain Update : मुंबईत 2 दिवस मुसळधार, पुण्यातही अतिवृष्टी; पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये धो धो बरसणार!

आज सोमवारच्या सकाळी सहाच्या प्राप्त आकडेवारीनुसार उजनी धरण 76 पूर्णांक 27 टक्के क्षमतेने भरलेला आहे. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 104 पूर्णांक 52 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. जेव्हा उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरलं जातं त्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा मावतो.उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी इतकी आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com