Bhimashankar : पुण्यातील भीमाशंकर ज्योर्तिलिंग 3 महिने बंद राहणार, महाशिवरात्रीला मंदिर खुलं असेल की बंद? 

Bhimashankar Temple Closed for 3 Months : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योर्तिलिंग श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील तीन महिने बंद राहणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Jyotirlinga Sri Kshetra Bhimashankar Temple Closed for 3 Months : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योर्तिलिंग श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील तीन महिने बंद राहणार आहे. फेब्रुवारी महिन्यात १५ तारखेला येणाऱ्या महाशिवरात्रीला दर्शन घेता येईल की नाही? याबाबत भाविकांमध्ये साशंकता आहे. महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक ज्योर्तिलिंगाच्या दर्शनासाठी येत असतात. यंदा तीन महिने मंदिर बंद असल्याने महाशिवरात्रीसाठी मंदिर खुलं असेल की बंद याबाबत भाविकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे. अखेर याबाबत मंदिर व्यवस्थापनाने माहिती दिली आहे. 

३ महिने भाविकांना दर्शन घेता येणार नाही, महाशिवरात्रीचं काय? l Bhimashankar temple be closed or open on Mahashivratri?

विकास आराखड्यांतर्गत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून विविध तांत्रिक आणि बांधकामाची कामं केल्यानंतर मंदिर सुरू होईल. ९ जानेवारापासून पुढील तीन महिन्यांसाठी हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरतं बंद ठेवण्यात येणार आहे.  १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री  आहे. या दिवशी मंदिर खुलं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. त्याचा विचार करून १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. 

288 कोटींचा भव्य विकास आराखडा

भीमाशंकरच्या विकासासाठी सरकारने एकूण 288.17 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या आराखड्यांतर्गत कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित पाहुयात.

  • दर्शन रांगेचे नियोजन, पिण्याचे पाणी आणि निवासाची सोय.
  • पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता दुरुस्तीची कामे.
  • रस्ते, पार्किंग आणि परिसरातील स्वच्छता व्यवस्था.

नक्की वाचा - Pune News : शिवरायांबद्दल अवमानकारक लिखाण, तब्बल 2 दशकांनी ऑक्सफोर्ड नरमला; पुस्तकाबद्दल मागितली माफी

2027 च्या कुंभमेळ्याचे नियोजन

2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा दरम्यान भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन त्यापूर्वीच सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असताना पूजा-अर्चा किंवा पर्यायी दर्शन व्यवस्थेबाबत देवस्थान ट्रस्ट लवकरच स्पष्टीकरण देणार आहे. भाविकांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement