Pune News : शिवाजी : 'हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' (Shivaji: Hindu King in Islamic India) या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील अवमानकारक लिखाणाबाबत ऑक्सफोर्डने माफी मागितली आहे. तब्बल २२ वर्षांनी ही माफी मागण्यात आली आहे.
ऑक्सफर्डच्या या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजामातांबद्दल अत्यंत अपमानास्पद आणि वादग्रस्त गोष्टी लिहिल्या होत्या. आता २२ वर्षांनंतर या पुस्तकाचे प्रकाश ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी प्रेसने सार्वजनिकपणे माफी मागितली आहे. एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या सार्वजनिक सूचनेत, ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी प्रेसने कबुल केलं की, २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या 'शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकाच्या पृष्ठ ३१, ३३, ३४ आणि ९३ वरील काही विधाने पडताळणी न केलेली होती.
नक्की वाचा - Sambhajinagar Election 2026: संभाजीनगर महापालिका कोण जिंकेल? 'असं' आहे राजकीय चित्र
जेम्स लेन अमेरिकेत इतिहास आणि धर्म विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्यातील वादग्रस्त मजकुरावरुन संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. पुण्यात याविरोधात हिंसक आंदोलनही झालं होतं. २००३ मध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ऑक्सफोर्डला एक निवेदन पाठवलं होतं. अखेर याची दखल घेत भावनांचा सन्मान करीत ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने माफी मागितली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
