Bhiwandi Election 2026: लाठ्याकाठ्या, खुर्च्या अन् दगड.. भाजप- काँग्रेस गटात तुफान राडा; भिवंडीत दोन गट भिडले

सायंकाळी काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली या भागात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणूनबुजून भाजपा कार्यालयाकडे जात घोषणाबाजी केली, ज्यावरुन वाद वाढला.

जाहिरात
Read Time: 2 mins

भुपेंद्र अंबवणे, भिवंडी:

Bhiwandi municipal corporation Election 2026:  भिवंडी पालिका सार्वत्रिक निवडणुकीत खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास प्रभाग 20 मधील नारपोली भंडारी चौक या ठिकाणी भाजपा व काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे. ज्यामध्ये दोन्ही बाजूकडून लाठ्या काठ्या व दगडांचा मारा केल्याने दोन जण जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं? 

समोर आलेल्या माहितीनुसार, भंडारी चौक नारपोली येथील वॉर्ड क्रमांक २० येथे भाजपा उमेदवार यशवंत टावरे व काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यालय रस्त्यात समोर समोर आहेत. सायंकाळी काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली या भागात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणूनबुजून भाजपा कार्यालयाकडे जात घोषणाबाजी केली.

Maharashtra Election 2026 : महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी किती उमेदवार रिंगणात? पाहा संपूर्ण यादी

ज्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाल्यानंतर दोन्हीकडून प्लास्टिक खुर्च्या लाठ्या काठ्या व दगड भिरकावण्यात आले. विशेष म्हणजे रॅलीत सुद्धा पोलिस होते. त्यांच्या देखत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप भाजपा उमेदवार यशवंत टावरे यांनी केला आहे.

एकमेकांविरोधात गुन्हा दाखल 

"आम्ही काँग्रेस उमेदवाराची रॅली काढून डोअर टू डोअर प्रचार करत असताना त्यांनी आम्हाला त्या विभागात जाण्यापासून रोखले. त्यानंतर महिलांवर भाजपा कार्यकर्त्यांनी दगडफेक करीत हल्ला चढवला. 2017 मध्ये माझ्या वडिलांची हत्या केली होती. आता उमेदवार असलेल्या माझ्या आईवर हल्ला चढवला. त्यांनी काँग्रेस कार्यालयावर खुर्च्या दगड फेकून मारले," असा आरोप काँग्रेस नगरसेविका वैशाली म्हात्रे यांची मुलगी हर्षाली म्हात्रे यांनी केला आहे.

नक्की वाचा >> Pune News: इंदापुरात बुलडोझर, या मंत्र्याचा एक आदेश अन् रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या, घरे, दुकाने झाली जमीनदोस्त

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान या हाणामारीच्या घटनेनंतर नारपोली व भोईवाडा पोलिस ठाण्यातील मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल होत त्यांनी सौम्य लाठी चार्ज करून परिसरातील गर्दी पांगवली.  या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही बाजूकडून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Advertisement