जाहिरात

Kolhapur News : सरकारी शाळेत प्रवेशासाठी पालकांची आदल्या रात्रीपासून तोबा गर्दी; खासगी शाळेला देतेय टक्कर 

एकीकडे खाजगी शाळेचं पेव फुटले असताना दुसरीकडं महापालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची धडपड का असते?

Kolhapur News : सरकारी शाळेत प्रवेशासाठी पालकांची आदल्या रात्रीपासून तोबा गर्दी; खासगी शाळेला देतेय टक्कर 

विशाल पुजारी, प्रतिनिधी

हल्ली सरकारी शाळा म्हटलं की अनेक नाक मुरडत असतात. मात्र काही शाळा अशा आहेत की जिथं आजही पालक आवर्जून मुलांना या शाळेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. कोल्हापुरातली एक सरकारी शाळा याच उत्तम उदाहरण. जिथं पालकांनी मुलांना प्रवेश मिळावा यासाठी मोठी गर्दी केलेली. गुढीपाडव्याच्या दिवशी शाळेत आपल्या पाल्याच नाव नोंदवून भविष्य घडवण्यासाठी सज्ज झालेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही सरकारी शाळा आहे कोल्हापुरातील महानगरपालिकेची. श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर असं या शाळेच नाव असून या शाळेची ख्याती शहरच नव्हे राज्यात पोहचली आहे. दरवर्षी या शाळेत गुढीपाडव्याच्या दिवशी इयत्ता 1 लीची प्रवेश प्रक्रिया असते. यंदाही ही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशासाठी पालकांनी मोठी गर्दी केलेली. पालकांच्या या गर्दीमूळे एका बाजूला खासगी शाळांमुळे शासकीय, महापालिकेच्या शाळा बंद पडत असल्याचे दृश्य असताना दुसऱ्या बाजूला मात्र कोल्हापूरच्या महापालिका शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी चक्क पालकांनी शाळेसमोर रांगा लावल्याच पाहायला मिळालं.. खासगी संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ आपण नेहमीच पाहतो, पण महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी गर्दी होणारी कदाचित राज्यातील ही पहिलीच शाळा असेल..

श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या शाळेत गुढीपाडव्या दिवशी प्रवेश प्रक्रिया होते. आज रविवारी गुढीपाडव्या दिवशी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र पालकांनी आदल्या दिवशी सकाळपासूनच प्रवेश मिळावा यासाठी हजेरी लावली..त्यामुळे जरगनगर शाळा परिसर विद्यार्थी - पालकांनी गजबजल्याचं पहायला मिळालं. 

Kalyan News: कल्याण अपहरणाची हादरवणारी Inside Story, 'त्या' एका गोष्टीमुळे शिजला कट

नक्की वाचा - Kalyan News: कल्याण अपहरणाची हादरवणारी Inside Story, 'त्या' एका गोष्टीमुळे शिजला कट

महापालिकेच्या शाळेत मुलांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी गर्दी का?

एकीकडे खाजगी शाळेचं पेव फुटले असताना दुसरीकडं महापालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची धडपड का असते? याच कारण आहे शाळेची प्रगती. जरग नगर शाळा ही महापालिकेची कोल्हापुरातील सर्वोत्कृष्ट शाळा असून याचं शाळेतील अनेक मुले राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षेत अग्रक्रमाने येतात..त्यामुळेच या शाळेत अॅडमिशन मिळावं यासाठी अनेक पालक सुरुवातीपासून प्रयत्न करत असतात.. महापालिकेची शाळा असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडण्याजगी शाळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कमी खर्च आणि दर्जेदार शिक्षण यामुळेच पालकांचा कल या महापालिका शाळेकडे वळल्याचे दिसून येतं. 

यंदा पालकांना कुपन पद्धतीमुळे दिलासा 

गेल्या वर्षी तर याच शाळेसमोर पालकांनी रात्र जागून काढली होती.. काही गर्दी झाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती देखील असते. यंदा मात्र शाळा प्रशासनाने कुपन पद्धत लागू केली. रात्री नऊ वाजता हे कुपन देण्यात आले. या कुपन पद्धतीमुळे अनेकांना दिलासा मिळाला. शनिवारी सकाळपासूनच पालकांनी शाळेबाहेर गर्दी केलेली. ही गर्दी पाहूनच शाळा प्रशासनाने यंदा ही नवीन पद्धत लागू केली.  प्रवेश घेण्यासाठी जे पालक येतील त्यांना त्या त्या क्रमांकाचे कुपन दिले गेले. आता या कुपनुसार प्रत्येकाला बोलावलं जाईल. त्यामुळे प्रवेशावेळी होणारी गर्दी आटोक्यात आली आहे.