जाहिरात

कोल्हापुरात मस्सोजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? पाटगावचे सरपंच 2 महिन्यापासून गायब, त्यांच्या सोबत काय झालं?

संतोष देशमुख हे मस्साजोगचे सरपंच होते. त्याचा अगदी निर्दयी पणे खून करण्यात आला होता.

कोल्हापुरात मस्सोजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? पाटगावचे सरपंच 2 महिन्यापासून गायब, त्यांच्या सोबत काय झालं?
  • बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती
  • कोल्हापुरच्या भुदरगड तालुक्यातील माजी सरपंच महेश पिळणकर दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत.
  • गावकऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दसरा चौकात आंदोलन केले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कोल्हापूर:

विशाल पुजारी

Shocking news: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडली होती. राज्याला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची आज ही चर्चा होते. ते कुणी ही विसरले नाही. त्यातच कोल्हापुर जिल्ह्यातही तसाच काहीसा प्रकार घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा अद्यापही ठावठीकाणा लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या सोबत नक्की काय झालं असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिने शोधाशोध करुनही त्यांच्याबाबत काहीच माहिती हाती लागलेली नाही. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणामुळे कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होतेय का असा सवाल आता उपस्थित होत आहे. याचं कारण म्हणजे या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सरपंचाचा काहीच ठाव ठिकाणी लागत नाही. त्यामुळे  संविधान हक्क संघर्ष समितीच्यावतीने आज कोल्हापुरातील दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. इतकंच नाही तर आंदोलकांनी माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या कुटुंबीयांसह कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. 

नक्की वाचा - Video: बिथरलेला रेडा थेट दुकानात घुसला! दुचाकीला धडक, मुलांचा जीव मुठीत, दहशतीचा थरार CCTV मध्ये कैद

यावेळी महेश पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर आणि त्यांचा मुलगा पारस महेश पिळणकर उपस्थित होते. यावेळी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शिवाय या प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तातडीने चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महेश पिळणकर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं सांगितलं आहे. कुटुंबीयांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असं आश्वासन ही त्यांनी दिलं आहे. मात्र हे आश्वासन पुर्ण होणार का?  महेश पिळणकर यांचा शोध लागणार का हा खरा प्रश्न आहे. 

नक्की वाचा - Rapido bike ban: रॅपिडोला सरकारचा दणका! थेट परवानाच रद्द, काय घडलं, कारण काय?

संतोष देशमुख हे ही मस्साजोगचे सरपंच होते. त्याचा अगदी निर्दयी पणे खुन करण्यात आला होता. त्याचे व्हिडीओ फोटो ही समोर आले होते. ते पाहून संपुर्ण महाराष्ट्र हळहळला होता. एका सरपंचाची अशी अवस्था केली जावू शकते हे महाराष्ट्राने पाहीले. त्यांचे आरोपी सध्या गजाआड आहे. तर एक आरोपी अजूनही फरार आहे. कोर्टात केस सुरू आहे. त्यात तारीख पे तारीख पाहायला मिळत आहे. असं असताना आता अशा पद्धतीची एक केस कोल्हापुरात समोर आली आहे.  महेश पिळणकर यांच्या सोबत काही चुकीचं घडलेलं नसावं अशी प्रार्थना त्यांच्या गावातले गावकरी करत आहेत. 

नक्की वाचा - Rohit Sharma Video: भर मैदानात रोहित शर्मा बायकोवर खेकसला, दोघांची हमरी-तुमरी कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com