येणाऱ्या नव्या वर्षापासून बोगस, झोलाछाप डॉक्टरांपासून रुग्णांचा बचाव करू शकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. या नव्या वर्षापासून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा नवा आणि देशातील पहिला ऐतिहासिक उपक्रम सुरू होणार आहे. आता महाराष्ट्रात डॉक्टरांकडे जाणाऱ्या प्रत्येकाला तो डॉक्टर वैद्यकीय पदवी प्राप्त आहे की नाही किंवा योग्य रित्या प्रशिक्षित आहे की नाही हे आधीच कळू शकेल. त्यांचे विशेष प्राविण्य कोणत्या वैद्यकीय क्षेत्रात हे कळेल. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने यंदाच्या वर्षात मोठं पाऊल उचललं आहे.
नक्की वाचा - Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे
‘नो यूअर डॉक्टर' नावाच्या व्यवस्थेद्वारे एक क्यूआर कोड डॉक्टरांच्या क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये ठळकपणे दिसेल. हे क्यूआरकोड प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरकडे असेल. याचा अर्थ ज्याच्याकडे हे क्यूआरकोड नसेल तो कौन्सिलकडे नोंदणीकृत नाही, असा स्पष्ट अर्थ होतो. आज ही लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात पुरेशी कारवाई होत नाही. अशावेळी ही व्यवस्था नव्या वर्षाची गिफ्ट ठरणार यात शंका नाही.
या नव्या उपक्रमामुळे वैध डॉक्टरांची ओळख आता एका क्लिकवर सहज शक्य होईल. त्यामुळे बोगस आणि अवैध डॉक्टरांना आता कायमचे गुड बाय म्हणा.