Pune E- Buses News: पुणेकरांसाठी केंद्राकडून सर्वात मोठं गिफ्ट! ट्रॅफिकचे टेन्शन मिटणार, काय आहे मेगाप्लॅन?

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा.श्री. एच.डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केले असून, लवकरच या बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल व्हायला सुरुवात होईल. 

जाहिरात
Read Time: 2 mins

1000 E Buses For Pune City: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून पुणेकरांसाठी मोठी आणि ऐतिहासिक भेट प्राप्त झाली असून पीएम ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाला (PMPML) तब्बल १००० नव्या इलेक्ट्रिक बस मिळण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा.श्री. एच.डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केले असून, लवकरच या बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल व्हायला सुरुवात होईल. 

केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.  या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, कार्बन उत्सर्जन घटेल आणि नागरिकांना अधिक कार्यक्षम, आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल.

PMC Reservation Draw: पुणे महापालिकेचे आरक्षण जाहीर! कुठल्या वॉर्डात कुणाची लॉटरी? संपूर्ण यादी लगेच चेक करा

"यासाठी आपण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्नशील होतो. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारदरम्यान समन्वय साधत, मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीमान करण्याचे काम केले. राज्य सरकारकडून रिझर्व्ह बँकेला आवश्यक पत्र पाठविल्यानंतर पीएमपीएमएलचा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. नवी दिल्ली येथे एच. डी. कुमारस्वामी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्यांनी तत्काळ या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले होते, आणि आज त्या प्रयत्नांना यश आले आहे," असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. 

पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्याचा आमचा निर्धार आहे. सध्या ३२ किलोमीटरवर मेट्रो धावत आहे आणि शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. मेट्रोचे विस्तारित मार्ग, नव्या बस सेवा आणि ई-वाहतूक यांचा संगम साधून आम्ही “स्मार्ट, ग्रीन आणि सस्टेनेबल पुणे” घडविण्याच्या दिशेने काम करत आहोत. पीएमपीएमएलच्या ताफ्यात अधिकाधिक बस समाविष्ट करून वाहतूक व्यवस्थेचा कणा अधिक मजबूत करणे हे आमचे प्राधान्य राहील, असे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.