जाहिरात

मराठा समाजासाठी सर्वात मोठी Good News! फडणवीस सरकारकडून तब्बल 8 सरकारी योजना लागू; वाचा कसा होणार फायदा

Maratha community educational benefits:  गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे हक्क आणि सवलतींसाठी संघर्ष करणाऱ्या मराठा समाजाला आता राज्य सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे.

मराठा समाजासाठी सर्वात मोठी Good News! फडणवीस सरकारकडून तब्बल 8 सरकारी योजना लागू; वाचा कसा होणार फायदा
CM Devendra Fadnavis : मराठा समाजासाठी फडणवीस सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई:

Maratha community educational benefits:  गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे हक्क आणि सवलतींसाठी संघर्ष करणाऱ्या मराठा समाजाला आता राज्य सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, आता इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सरकारी सोयी-सुविधा थेट मराठा समाजालाही दिल्या जाणार आहेत. सरकारच्या या पावलामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी नवीन दारे खुली होणार आहेत.

महागाई आणि स्पर्धेच्या या युगात शिक्षणाचा खर्च परवडत नसलेल्या मराठा कुटुंबांतील मुलांसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. ओबीसी समाजाच्या धर्तीवर तब्बल 8 मोठ्या सरकारी योजना आता मराठा समाजासाठी सुरू करण्यात येत असून, यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

मराठा समाजासाठी सुरू होणाऱ्या 8 महत्त्वाच्या योजना

सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजाला नेमका कोणत्या योजनांचा फायदा मिळणार आहे, ते आपण सविस्तर समजून घेऊया.

पहिली महत्त्वाची योजना म्हणजे शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू होईल. दुसरी म्हणजे रोजगाराला चालना देणारी मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना देखील सुरू करण्यात येत आहे. तिसरी योजना म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली विशेष शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजाच्या मुलांनाही मिळेल. चौथी योजना विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींबाबतची खर्च प्रतिपूर्ती म्हणजेच फी आणि इतर खर्चाचा परतावा मिळण्याबाबतची असेल.

पाचवी योजना ही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत, मात्र परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले आहेत, त्यांनाही आता या सवलतींचा लाभ घेता येईल. या सर्व योजनांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना पैशांअभावी शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येणार नाही.


( नक्की वाचा : English Medium School: इंग्रजी शाळांची लूट थांबणार! अवास्तव फी आणि कमिशनखोरीवर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक )
 

व्यावसायिक अभ्यासक्रम आणि रिक्त जागांवरही सवलती मिळणार

या नवीन धोरणानुसार, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्वच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी देखील पूर्णपणे पात्र धरले जातील. यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा इतर कोणतेही व्यावसायिक कोर्सेस समाविष्ट असतील.

यातील सर्वात महत्त्वाचा आणि दिलासादायक मुद्दा म्हणजे, अनेकदा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप (CAP) राउंड पूर्ण झाल्यानंतर काही जागा रिक्त राहतात. अशा रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावर म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हलवर ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, अशा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील आता ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती लागू करण्यात येणार आहेत. यामुळे खाजगी किंवा संस्थास्तरावरील महागड्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

( नक्की वाचा : मोठी बातमी! येत्या 5 वर्षांत देशातले प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन गायब होणार? वाचा काय आहे कारण? )
 

भविष्यातील योजनाही आपोआप लागू होणार

फडणवीस सरकारने या निर्णयात एक अत्यंत महत्त्वाचा नियम जोडला आहे. त्यानुसार, ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा सध्या इतर मागास प्रवर्गास म्हणजेच ओबीसी समाजास लागू करण्यात आल्या आहेत, त्या तर मराठा समाजाला मिळतीलच. पण यापुढे भविष्यातही ओबीसी समाजासाठी सरकार जे काही नवीन निर्णय किंवा सवलती जाहीर करेल, त्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा कोणत्याही नवीन आदेशाची वाट न पाहता पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू केल्या जातील.

सरकारच्या या दूरगामी निर्णयामुळे मराठा समाजातील तरुण पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठी मदत होणार असून, संपूर्ण राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com