Nanded News: बिहारमध्ये हरवलेलं कुटुंब नांदेडमध्ये एकत्र! चित्रपटालाही लाजवेल अशी सत्य कथा; वाचून डोळे पाणावतील

Bihari Family Missing Story Nanded: श्रद्धा फाउंडेशनने तात्काळ नांदेडमध्ये शोध घेतला अन नशिबाने या दोन्ही मुली नांदेडात शिशुगृहात सापडल्या. मंतादेवीच्या पतीचाही बिहारमध्ये शोध लागला तेही नांदेडला आले.

जाहिरात
Read Time: 3 mins

योगेश लाटकर, नांदेड:

Bihar Missing Family Heart Touching Story: सुमारे वर्षभरापूर्वी एक महिला बिहारमधून 2 लहान मुलींना घेऊन हरवली अन थेट नांदेडमध्ये अवतरली. पुढे नांदेडमध्ये या महिलेची 5 वर्षीय मुलगी अन 3 महिन्यांची मुलगीही हरवली. या धक्क्यामुळे महिला मनोरुग्णासारखी  नांदेडमध्ये फिरत राहिली. नांदेड पोलिसांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले पुढील उपचार झाले. महिला वेडाच्या भ्रांतीतून एका एनजीओच्या मदतीने बाहेर आली अन चमत्कार झाला. महिलेला हरवलेल्या दोन्ही मुली परत मिळाल्या महत्वाचे म्हणजे तिचा पतीही तिला परत मिळाला. काळजाचा ठाव घेणाऱ्या या हृदयस्पर्शी घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Parbhani News : शाळेच्या फीवरून वाद; संस्थाचालकाच्या मारहाणीचा पालकाचा मृत्यू

काय आहे प्रकरण?

बिहारमधील बिरबल महतो यांच्या परिवारात पत्नी अन 2 मुली, बिहार राज्यात यांचा सुखाचा संसार सुरु होता. मागील वर्षी रक्षाबंधनाला त्यांची पत्नी माहेरी जाऊन येते म्हणून गेली ती गायब झाली. बिरबल यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण ना पत्नी मिळाली न मुली. त्यांची पत्नी वेडसरपणाच्या भ्रांतित बिहारमधून थेट नांदेड शहरात पोहोचली होती.  सुरुवातीला मंतादेवी 2 लहान मुलींना घेऊन नांदेडमध्ये भटकंती करायला लागली पण दुर्दैवाने तिच्या दोन्ही मुली हरवल्या.

Advertisement

मंतादेवीचा वेडसरपणा अधिक उग्र झाला. नांदेड पोलिसांनी तिला पहिले शासकीय रुग्णालय नांदेड आणि पुढे सप्टेंबर 2024 साली येरवडा इथं दाखल केले. 8 महिन्यांनी मंतादेवीची तब्येत सुधारल्यावर तिला रायगड येथील एनजीओ श्रद्धा पुनर्वसन केंद्रात टाकण्यात आले. हळूहळू तिची स्मृती परत यायला लागली. तिच्या दोन मुली हरवल्याचं तीन सांगितले. श्रद्धा फाउंडेशनने तात्काळ नांदेडमध्ये शोध घेतला अन नशिबाने या दोन्ही मुली नांदेडात शिशुगृहात सापडल्या. मंतादेवीच्या पतीचाही बिहारमध्ये शोध लागला तेही नांदेडला आले.

Advertisement

Taliban: 6 वर्षांची नवरी, 45 वर्षांचा नवरा! अफगाणिस्तानातील धक्कादायक प्रकार, तालिबाननं दिला अजब आदेश

बिहारमधील बिरबल महतो रोजंदारी करून आपली अन कुटुंबाची गुजराण करायचे पण जेव्हापासून त्यांची पत्नी अन मुली हरवल्या तेव्हापासून फक्त त्यांच्या शोध हे एकमेव काम त्यांनी केले. नांदेडच्या शिशुगृहात जेव्हा त्यांनी पहिले मुलीला पहिले तेव्हा पत्नी पत्नीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. सुमारे वर्षभराने त्यांनी आपल्या मुलीला मिठी मारली होती. श्रद्धा फाउंडेशन अन महाराष्ट्रातील लोकांना ते माणूस नव्हे तर देवदूत म्हणत आहेत.

Advertisement

 खरंतर या कुटुंबाला एकत्र आणण्यात श्रद्धा फाउंडेशनचे महत्वाचे योगदान आहे त्यांनीच बिरबल यांच्या शोध लावला अन तिथून पुढे मुलींचाही शोध लावला त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेतच, पण नांदेड पोलिसही तितक्याच कौतुकास पात्र आहे. कारण बेवारस सापडलेल्या मुलींना त्यांनी योग्य ठिकाणी नोंदी घेत पाठवले, त्यामुळे एक आई आपल्या दोन मुलींना पुन्हा भेटू शकली तर एक वडील आपल्या पत्नीला अन मुलींना पुन्हा भेटू शकले. नुकतेच बिरबल महतो यांचे कुटुंब नांदेड रेल्वेस्थानकावरून पुन्हा आपल्या बिहारकडे रेल्वेने रवाना झाले.

Navi Mumbai : आई-वडिलांच्या मृत्यूचा धक्का! 3 वर्ष ठेवले स्वत:ला केले कैद, संपूर्ण प्रकार वाचून डोळ्यात येईल पाणी