
6 year old Afghan girl marriage: दक्षिण अफगाणिस्तानमध्ये एका सहा वर्षांच्या मुलीला तिच्या वडिलांनी पैशांसाठी विकल्यानंतर, कथितरित्या ४५ वर्षांच्या व्यक्तीशी जबरदस्तीने लग्न लावून दिले आहे. यू.एस.-आधारित अफगाण वृत्तसंस्था Amu.tv नुसार, हा विवाह मारजाह जिल्ह्यात झाला, जिथे दोन इतर पत्नी असलेल्या त्या व्यक्तीने मुलीच्या कुटुंबाला लग्नासाठी पैसे दिले. त्यानंतर तालिबानने त्या व्यक्तीला मुलीली घरी घेऊन जाण्यापासून रोखले पण, आणखी एक अजब आदेश दिला.
तालिबानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्या मुलीला नवव्या वर्षी तिच्या पतीच्या घरी पाठवले जाऊ शकते. स्थानिक तालिबान अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केले नाही, परंतु त्यांनी आतापर्यंत मुलीला त्या व्यक्तीच्या घरी घेऊन जाण्यापासून रोखले आहे.
( नक्की वाचा : Lishalliny Kanaran : 'माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला आणि...' अभिनेत्रीचा पुजाऱ्यावर गंभीर आरोप! )
काय आहे प्रकरण?
मारजाह जिल्ह्यात मुलीचे वडील आणि वर यांना अटक करण्यात आली आहे, तरीही त्यांच्यावर कोणतेही औपचारिक आरोप दाखल करण्यात आलेले नाहीत. सध्या ती मुलगी तिच्या पालकांसोबत असल्याचे हश्त-ए सुबह डेलीने वृत्त दिले आहे. या विवाह व्यवस्थेमध्ये 'वालवर' नावाच्या पारंपारिक प्रथेचा समावेश होता, ज्यानुसार मुलीची शारीरिक ठेवण, शिक्षण आणि अपेक्षित मूल्यावर आधारित वधूची किंमत निश्चित केली जाते.
या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे, ऑनलाइन आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
( नक्की वाचा : Xi Jinping : शी जिनपिंग लवकरच पद सोडणार? गूढ हलचालींमुळे चर्चेला उधाण! कट्टर विरोधक होणार अध्यक्ष? )
अफगाणिस्तानमध्ये बालविवाह
2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा पुन्हा घेतल्यापासून, वाढती गरिबी आणि महिला व मुलींवरील कडक निर्बंध, विशेषतः महिला शिक्षणावर बंदी यामुळे देशात बालविवाह आणि लवकर होणाऱ्या विवाहांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानमध्ये लग्नासाठी कायदेशीर किमान वय नाही.
गेल्या वर्षी यूएन वुमनच्या अहवालानुसार, तालिबानच्या मुलींच्या शिक्षणावरील बंदीमुळे बालविवाहामध्ये 25% वाढ झाली आहे आणि देशभरात लवकर गर्भधारणेमध्ये 45% वाढ झाली आहे, ज्यामुळे आधीच अस्थिर सामाजिक-आर्थिक परिस्थितीत तरुण मुलींची असुरक्षितता वाढली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world