Asha Buchke Troll : सुनेत्रा पवारांना धक्काबुक्की, ताटकळत ठेवलं; भाजपच्या आशा बुचकेंच्या वागणुकीवर संताप

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपच्या आशा बुचके यांच्यावर सोशल मीडियातून ट्रोलिंग सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, प्रतिनिधी

Asha Buchke troll : किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्या आशा बुचके यांना कार्यक्रमादरम्यानच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला जात आहे.

आशा बुचकेंची सुनेत्रा पवारांना धक्काबुक्की...

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपच्या आशा बुचके यांच्यावर सोशल मीडियातून ट्रोलिंग सुरू आहे. या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आशा बुचके यांनी मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत आमदार शरद सोनवणे यांच्याकडून माईक हिसकावून घेत भाषण केलं. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ताटकळत उभं राहावं लागलं, याचा व्हिडिओ समोर आला आहे.

नक्की वाचा - Ajit Pawar Plane Crash : आणखी एक व्हिडिओ समोर; मुख्यमंत्र्यांचा त्याच कंपनीच्या विमानातून बारामतीपर्यंत प्रवास

शिवरायांच्या पालखीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालखी घेऊन जात होते. यावेळी आशा बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पुढे सरसावल्याचे दिसते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. हे दृश्य राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत घडले असल्याने नेटकऱ्यांनी आशा बुचके यांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला. यामुळे कार्यक्रमाच्या शिस्तीवर आणि राजकीय शिष्टाचारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पाळणा म्हणणाऱ्या महिलेलाही ढकलण्याचा प्रयत्न...

आणखी एका व्हिडिओत, शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असताना "पाळणा" म्हणणाऱ्या महिलेला बाजूला ढकलून बुचके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर फोटोसाठी पोझ दिल्याचे दिसते. हे वर्तन शिवजयंतीच्या साजऱ्याला अयोग्य ठरत असून, सोशल मीडियावर मीम्स आणि टीका सुरू आहे.

Advertisement