जाहिरात

Ajit Pawar Plane Crash : आणखी एक व्हिडिओ समोर; मुख्यमंत्र्यांचा त्याच कंपनीच्या विमानातून बारामतीपर्यंत प्रवास

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून बारामतीत आले होते त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 ऑक्टोबरला बारामतीत दाखल झाले होते.

Ajit Pawar Plane Crash : आणखी एक व्हिडिओ समोर; मुख्यमंत्र्यांचा त्याच कंपनीच्या विमानातून बारामतीपर्यंत प्रवास

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Ajit Pawar Plane Crash death : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून बारामतीत आले होते त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 ऑक्टोबरला बारामतीत दाखल झाले होते. २८ जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांचं निधन झालं. या घटनेनंतर अजित पवार ज्या विमानातून प्रवास करीत होते, त्यांच्याविरोधात अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत विमानाच्या व्हीएसआर कंपनीवर मोठे आरोप केले आहेत. दरम्यान तीन महिन्यांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला होता. फलटणच्या माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कंपनीच्या विमानातून आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर याच विमानाने मुख्यमंत्री यांनी मुंबईकडे प्रस्थान केलं होतं. 

नक्की वाचा - Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, पुण्यातील रुग्णालयात केलं दाखल

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानामधून प्रवास करताना अपघात झाला. यात त्यांचं दुर्देवी निधन झालं. त्यांचा अपघात झाला त्या कंपनीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्र्यांचा प्रवास...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून बारामतीत आले होते त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 ऑक्टोबरला बारामतीत दाखल झाले होते. फलटणच्या माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर या कंपनीच्या विमानातून आले होते. त्या विमानाचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर याच कंपनीच्या विमानाने मुख्यमंत्री यांनी मुंबईकडे प्रस्थान केलं होतं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com