मुंबई: मुंबईतील सर्व जमिनीच्या लँड स्कॅमचे बादशाहा हे उद्धव ठाकरे आहेत. म्हणून त्यांच्या डोक्यात लँड आणि लँड स्कॅम सुरू असतात, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे नेते, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांच्या या भाषणाचा ऑडियो सध्या व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाने मुंबईतील गरवारे क्लबमध्ये वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी आज कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
'उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात कायम लँड स्कॅम असतात. मुंबईतील सर्व जमिनीच्या लँड स्कॅमचे बादशाहा हे उद्धव ठाकरे आहेत.म्हणून त्यांच्या डोक्यात लँड आणि लँड स्कॅम सुरू असतात. म्हणून भाजपवाले जमिनी घेतील आणि उद्योजकांना देतील असे ते सांगतायत..' अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
(नक्की वाचा- "भांडण बाजूला ठेवायला तयार!", उद्धव ठाकरेंची अटींसह राज यांच्यासोबत यायला तयारी)
तसेच 'मुंबईत एका स्क्वेअर फुटची किंमत 1 लाख रुपये आहे. तुमची 25 वर्ष पालिकेत सत्ता होती. मुंबईतील जमीन बिल्डरांना देण्याच पाप हे उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हे उद्धव ठाकरे आम्हाला प्रश्न का विचारत आहेत? असे म्हणत कोणतीही जागा बिल्डरला जाणार नाही हे मी आताच सांगतोय..' असेही आशिष शेलार यावेळी म्हणाले.
नक्की वाचा - Prajakta Mali : प्राजक्ता माळीने अख्ख्या जगालाच केलं चॅलेन्ज, नॉनव्हेज खाण्यावरून तोडले अकलेचे तारे!