Haji Arafat Sheikh : भाजप नेते थोडक्यात बचावले, हाजी अराफत शेख यांच्या कारला अपघात

कळंबोलीजवळ हाजी अराफत शेख यांच्या ताफ्यासह पाच ते सहा गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

खोपोलीहून मुंबईला परतत असताना भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती आहे. कळंबोलीजवळ हाजी अराफत शेख यांच्या ताफ्यासह पाच ते सहा गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. रात्री 8 वाजता हा अपघात घडल्याची माहिती आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ हा अपघात झाला असून या अपघातात हाजी अराफत यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताफ्यातील वाहनांचे मोठे नुकसान झालं आहे. 

नक्की वाचा - Crime News: 21 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वे रुळावर मृतदेह, आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचे गंभीर आरोप

काल 18 मे रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला अपघात झाला झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. 17 मे रोजी मध्यरात्री धाराशिव येथील वाशी नजिक भरधाव ट्रॅकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. लातूरकडून जालनाच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात कुणालाही काही दुखापत झालेली नाही. तुपकर यांच्यासह सुदैवाने वाहनातील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती आहे. 

Advertisement