देवा राखुंडे, प्रतिनिधी
Ajit Pawar's crashed plane Black box : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी आता एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमान अपघातावेळी कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात होते. कोणत्याही विमान अपघाताचं कारण ब्लॅक बॉक्समधून समोर येत असतं. मात्र दादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स नष्ट झाल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान बारामतीतून मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
बारामतीतून मोठी माहिती समोर...
अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स नष्ट झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विशेष म्हणजे, Aircraft Accident Investigation Bureau म्हणजेच AIB चे अधिकारी के. रामचंद्र यांनी 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी २ वाजता या ब्लॅक बॉक्सची पाहणी करून तो सुरक्षित असल्याची नोंद केली होती. इतकंच नाही, तर बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्याची आणि स्टेशन डायरीमध्ये ऑनलाईन नोंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विमान अपघाताचं कारण शोधण्यासाठी पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.