BMC Election 2026: महायुतीत कलह! मुंबईत शिवसेनेने केला भाजपचा गेम? 11 प्रभागांमध्ये छुपी खेळी केल्याचा आरोप

विजयाची खात्री असलेल्या तब्बल ११ प्रभागांमध्ये भाजपला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला असून, या पराभवाचे खापर आता अंतर्गत गटबाजीवर फोडले जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Municiple Corporation Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीने घवघवीत यश मिळवत सत्ता मिळवली. या निवडणुकीत तब्बल 89 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 29 मिळाल्या. मुंबईत भाजपला मोठे यश मिळाले असले तरी एकहाती सत्ता मात्र मिळू शकली नाही. अशातच आता मुंबई महापालिका निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील धुसफूस उघड होऊ लागली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप भाजपच्याच काही नेत्यांकडून होत आहे. 

महायुतीमध्ये धुसफूस वाढली

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली असली, तरी विजयाचा हा गुलाल भाजपच्या काही माजी नगरसेवकांच्या डोळ्यात झोंबणारा ठरला आहे. विजयाची खात्री असलेल्या तब्बल ११ प्रभागांमध्ये भाजपला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला असून, या पराभवाचे खापर आता अंतर्गत गटबाजीवर फोडले जात आहे.

Raj Thackeray: ठाकरेंचं 'ठरलं'? राज-उद्धव यांच्यातील जवळीक वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

विशेषतः शिंदे गटाने काही ठिकाणी छुपी मदत केल्याची चर्चा आता भाजपच्या गोटात सुरू झाली असून, यामुळे महायुतीतील धुसफूस उघड झाली आहे. ​मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्तेचा आकडा गाठण्याचे भाजपचे स्वप्न काही जागांनी अधुरे राहिले. निवडणुकीत ११ जागांवर भाजपच्या उमेदवारांना अगदी थोडक्यात पराभव पत्करावा लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या प्रभागांमध्ये महायुतीची मते सहजपणे ट्रान्सफर होणे अपेक्षित होते, तिथेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तटस्थ भूमिका घेतली किंवा थेट विरोधी काम केल्याचा आरोप भाजपचे काही माजी नगरसेवक करत आहेत. 

शिंदे गटाने दगा दिला.. भाजप कार्यकर्त्यांची भावना..

"आम्ही युतीधर्म पाळला, पण मित्रपक्षाने मात्र दगा दिला," अशी भावना पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. या अंतर्गत कलहाचा सर्वाधिक फायदा काँग्रेस पक्षाला झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने मुंबईत २४ जागांवर विजय मिळवून सर्वांना चकित केले. भाजपच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

BMC Election 2026: 'सगळी पदे वरळीमध्येच का?' किशोरी पेडणेकर यांच्या नियुक्तीवरुन ठाकरे गटात नाराजीनाट्य

 शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला साथ न देता पडद्यामागून काँग्रेसला मदत केल्यामुळेच काँग्रेसची ताकद वाढल्याची चर्चा आता भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये रंगली आहे. यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये मुंबईच्या सत्तेवरून मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.