जाहिरात

Rajya Sabha : पार्थ की जय पवार? राज्यसभेवर कोणाला संधी? सुनेत्रा पवारांच्या भाषणानंतर प्रफुल पटेलांची घोषणा

अजित पवार यांचे दोन्ही सुपूत्र यासाठी आग्रही असल्याची चर्चा होती. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Rajya Sabha : पार्थ की जय पवार? राज्यसभेवर कोणाला संधी? सुनेत्रा पवारांच्या भाषणानंतर प्रफुल पटेलांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. सुनेत्रा पवार यांच्यानंतर राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू होती. अजित पवार यांचे दोन्ही सुपूत्र यासाठी आग्रही असल्याची चर्चा होती. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. 

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, राज्यसभेसाठी ३७ मतांची आवश्यकता असले. आपले ४० आमदार आहेत. आपले सर्व आमदार पार्थ पवार यांना मतदान करतील. सुनेत्रा पवार यांनी अद्याप राज्यसभेचा राजीनामा दिलेला नाही. नव्याने होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे.

पार्थ पवार अनुपस्थित..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा केली. मात्र यावेळी पार्थ पवार अनुपस्थित असल्याची माहिती आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com