BMC Mayor News: मुंबई महापौरांच्या हातात 1 कोटींचं घड्याळ? माध्यमांवर चर्चा; स्वतः रितू तावडेंनी केला खुलासा

अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही, असं महापौर रितू तावडेंनी स्पष्ट केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Mayor Expensive Watch:  मुंबईच्या महापौर रितू तावडे सध्या त्यांच्या महागड्या घड्याळामुळे चर्चेत आहेत. रितू तावडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यांनी मनगटावर बांधलेले घड्याळ हे तब्बल एक कोटीचे असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. महापौरांचे हे महागडे घड्याळ पाहून नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. अशातच याबाबत आता स्वतः रितू तावडेंनी स्पष्टिकरण दिले आहे. 

Sunetra Pawar: राष्ट्रवादीच्या नव्या 'बॉस' समोर 5 मोठी आव्हानं, प्रत्येक पायरीवर असेल कसोटीचा प्रसंग !

नेमकं काय आहे प्रकरण? 

मुंबईच्या महापौर रितू तावडे या सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. रितू तावडे यांच्या महागड्या घड्याळावरुन सोशल मीडियावर जोरदाप चर्चा होत आहे. रितू तावडे यांच्या मनगटावर असलेले घड्याळ हे रोलेक्स येलो गोल्ड डायटोना आहे. त्याची किंमत जवळपास ६० ते ७० लाख असून .. भारतातली मार्केट किंमत १ करोड पेक्षा जास्त आहे, असं दावा एका नेटकऱ्याने केला होता. 

याबाबत आता स्वतः रितू तावडेंनी खुलासा केला आहे.  ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही, असं महापौर रितू तावडेंनी स्पष्ट केले आहे. 

Rajya Sabha : पार्थ की जय पवार? राज्यसभेवर कोणाला संधी? सुनेत्रा पवारांच्या भाषणानंतर प्रफुल पटेलांची घोषणा