महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संकटकाळात मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हुसैन मन्सूरी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या टीमने एकत्र मदत केली आहे.
हुसैन मन्सूरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली की, त्यांनी भूमी पेडणेकर यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यातील मांगोली गावातील पूरग्रस्त कुटुंबांना रेशन किटचे वाटप केले आहे. पुरामुळे ज्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि मूलभूत गरजांसाठी आवश्यक वस्तू असलेले रेशन किट्स पुरवण्यात आले.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Solapur Flood: फोन केला, फजिती झाली! पूरग्रस्तांसमोरच कलेक्टरने शिंदे गटाच्या नेत्याला झापलं, पाहा VIDEO)
या कठीण काळात प्रत्येक नागरिकाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, या भावनेतून हे मदतकार्य करण्यात आल्याचे, हुसैन यांनी म्हटलं. हुसैन यांना इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, भूमिका स्वत: सामनाचे किट ट्रकमध्ये टाकताना दिसत आहेत.
(नक्की वाचा- Dharashiv News: माणूसपण जपणारा अधिकारी! धाराशिव ZP सीईओंना धाराशिवकर आयुष्यभर लक्षात ठेवतील)
हुसैन मन्सूरी यांनी महाराष्ट्रासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे, जे या नैसर्गिक आपत्तीतून सावरत आहे. भूमी पेडणेकर आणि हुसैन मन्सूरी यांनी केलेल्या या सहकार्यामुळे मांगोली गावातील अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.