डायरी ऑफ होम मिनिस्टर! अनिल देशमुखांचे पुस्तक तयार, दिवाळीत आरोपांचा सुतळी बॉम्ब फुटणार

हे पुस्तक कधी प्रकाशित होणार याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र दिवाळीच्या आसपास हे पुस्तक प्रकाशित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष(शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन होईल अशी शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

संजय तिवारी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पुस्तक  (Anil Deshmukh Book) लिहिले आहे. अनिल देशमुख हे 14 महिने तुरुंगात राहीले असून तुरुंगात असतानाच त्यांनी हे पुस्तक लिहायला घेतले होते. "डायरी ऑफ होम मिनिस्टर" (Diary Of Home Minister) असं या पुस्तकाचं नाव असून हे पुस्तक हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा तीनही भाषांमध्ये प्रसिद्ध केले जाणार आहे. अनिल देशमुख यांनी हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे म्हटले असून त्यांनी याबाबतचे ट्विटही केले आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनिल देशमुखांविरोधातील प्रकरण नेमके काय आहे ?

महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. त्यांनी सचिन वाझेसारख्या पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केली असा आरोप आहे. याच प्रकरणाlत देशमुख यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने देशमुखांची 12 तास चौकशी केली होती आणि त्यानंतर त्यांना अटक झाली होती.

नक्की वाचा: काँग्रेसच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला? 'या' दिवशी नावं जाहीर होणार

अनिल देशमुखांवर खंडणी वसुलीचा आरोप त्यावेळचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनीच केला होता. परमबीर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी आरोप केला होता की देशमुख हे दर महिना 100 कोटींची खंडणी वसूल करतात आणि हे काम ते पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करत आहेत. परमबीर सिंह यांना अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाच्या तपासात ढिलाई दाखवल्याप्रकरणी आयुक्त पदावरून हटविण्यात आले होते.

नक्की वाचा: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 16 उमेदवार ठरले; 'या' नेत्यांना एबी फॉर्म मिळाले

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे याने एक पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती. पत्रामध्ये त्याने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. अँटिलियाबाहेर जिलेटीनच्या काड्या असलेली गाडी सापडली होती. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने वाझेला अटक केली होती. मनसुख हिरेन यांची हत्या ही देखील याच प्रकरणाशी निगडीत होती.

अनिल देशमुख ट्रोल महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुस्तकाबद्दलची माहिती देण्यासाठी X वर पोस्ट केली होती. त्यांच्या या पोस्टवरून त्यांना ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. एकाने म्हटलंय की, "साहेब तो पुस्तकांचा ढीग मला द्या रास्त दरात - एक भेळवाला " दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलंय की," एका पत्रकाराला कशा प्रकारे बदनाम केले याची पण सुरस कथा वाचायला मिळेल ना ?

हे पुस्तक कधी प्रकाशित होणार याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र दिवाळीच्या आसपास हे पुस्तक प्रकाशित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष(शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन होईल अशी शक्यता आहे. या पुस्तकात सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सनसनाटी आरोप केले असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शक्यता आणि चर्चांना अनिल देशमुखांकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.