भाजपने आपल्या 99 उमेदवारींची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारींची घोषणा करण्यात भाजपने बाजी मारली आहे. तर अजित पवारांनी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची सुरूवात केली आहे. मात्र काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आपल्या उमेदवारांची यादी अजूनही जाहीर केलेली नाही. 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. शिवाय दुसरी यादी कधी येणार ते ही पक्षश्रेष्ठींनी ठरवले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यादी आज मंगळवारी जाहीर होईल. तर दुसरी यादी 25 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. ज्या जागांवर वाद नाही अशा जागांवरचे उमेदवार पहिल्या यादीत असतील. हे उमेदवार कोण असणार हे पक्षाने निश्चित केले आहे. त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. विद्यमान आमदारांसह काही नव्या चेहऱ्यांना पहिया यादीत स्थान मिळेल अशी चर्चा आहे.
ट्रेंडिंग बातमी - उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?
राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीत आहेत. त्यांनी राज्यातल्या स्थिती माहिती हायकमांडला दिली आहे. जागा वाटपांची स्थितीही सांगण्यात आली आहे. राज्यातल्याच नेत्यांनी आज पहिली यादी जाहीर होईल असे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुांची दिल्लीतही वर्दळ वाढली आहे. दिल्लीच्या काँग्रेस कार्यालयात उमेदवारी साठी इच्छुक जमा होत आहे. त्यामुळे सर्वांनी संयम राखावा असे आवाहन पक्षातर्फ करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - पहिल्या यादीत नाव का नाही? भाजपचे विद्यमान आमदार थेट बोलून गेले
दिल्ली काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी डेरा टाकला आहे. प्रत्येक जण तिकीट मिळाले यासाठी आग्रही आहे. येथे इच्छुकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले जाते आहे. आपण संयम ठेवा, सत्ता आल्यावर सर्वांना न्याय मिळेल. पण त्यासाठी आधी सत्ता यावी म्हणून एकदिलाने काम करण्याची गरज आहे, असे मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश चेंनिथाला यांनी सांगितले. या दोघांना इच्छुक भेटत आहेत. त्यावेळी त्यांनी हा सल्ला काँग्रेसच्या इच्छुकांना दिला आहे.
हायकमांड ही या इच्छाकांबरोबर संवाद साधत आहेत. जे इच्छुक, पदाधिकारी, नेते येत आहेत त्यांना हायकमांडे समजावले आहे. शिवाय महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल. पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र मेहनत घेतली पाहिजे. सहयोगी पक्षांना विश्वासात घेतले पाहिजे. पक्षविरोधात बंडखोरी कराल तर येणारी सत्ता घालवून बसाल असे स्पष्ट सांगितले जात आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सावध पावलं उचलत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world