समाधान कांबळे, प्रतिनिधी
Higoli Bramhapuri Village : स्त्रीला स्वत:चं घर नसतं. ती वडिलांच्या घरात मोठी होते, लग्नानंतर नवऱ्याचं घर सांभाळते आणि म्हातारपणी मुलाच्या घरात राहते. अशी सर्वसाधारपणे समज आहे. गेल्या काही वर्षात यात काही प्रमाणात बदल झाला आहे आणि स्त्री स्वत:चं घर घेऊ लागली. मात्र तरीही मोठ्या संख्येने आजही अधिकांश महिलांची हीच स्थिती आहे. अशा परिस्थितील घरावर जर घरातील लहानग्या 'लक्ष्मी'चं नाव असेल तर?
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंगोलीच्या ब्रह्मपुरी या छोट्याशा गावानं एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. जवळपास दोनशे घरांचं हे छोटसं गाव. छान टुमदार घरं. हिरवागार परिसर. गावातील माणसंही तशी एकमेकांना जोडून राहणारी. गावात फिरताना एक गोष्ट तुमचं लक्ष वेधते ते म्हणजे या गावातील घरांवरील नावं. सर्वसाधारणपणे आईचं किंवा अगदी देवाच्या नावं घराला देण्याचा प्रकार रूढ आहे. मात्र या गावात घरातील लेकीबाळींची नावं घराला देण्याची पद्धत आहे.
नक्की वाचा - Pune Thief : दुचाकी चोरून पुन्हा मालकाकडे, सोबत क्षमायाचनेची चिठ्ठीही; अजब चोर पाहून पोलिसही चाट!
गावातील प्रत्येक घराला स्वतःच्या मुलीचे नाव देण्यात आलं आहे. जसं की ईश्वरी निवास, लक्ष्मी निवास, हर्षदा निवास... अशी स्वतःच्या लेकीबाळीचे नावं घरांना देऊन या गावकऱ्यांनी लेकीबाळींचा आगळावेगळा सन्मान राखलाय. एवढेच नव्हे तर या गावामध्ये लोकसहभागातून विविध कामे काम केली जातात. विशेष म्हणजे बिनविरोध निवडणूकही देखील घेतली जाते. या सर्वच बाबतीत हे गावकरी अग्रेसर आहेतच परंतु घरांला मुलींचं नाव दिल्याने या गावकऱ्यांनी लेकीबाळींचा अनोखा सन्मान केला आहे. त्यामुळे या गावाची राज्यभरात चर्चा सुरू आहे.