पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता लोक सीएनजी आणि आता तर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. मात्र अनेकदा विविध कंपन्यांच्या इलेट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. सांगलीतही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे तर नव्या कोऱ्या दुचाकीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगलीच्या अंकली येथील रत्नागिरी नागपूर महामार्गावर एक इलेक्ट्रिक बाईक आगीत जळून खाक झाली आहे. चालती गाडी बंद पडली आणि काही वेळातच गाडीने पेट घेतला. त्यानंतर काही क्षणात आगीने भीषण रूप घेतले. ज्यामुळे इलेक्ट्रिक बाइक जळून खाक झाली. आसपासच्या नागरिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो प्रयत्न यशस्वी ठरला आणि यामध्ये संपूर्ण इलेक्ट्रिक बाइक जळून खाक झाली.
नक्की वाचा - India Pakistan Tension : पाकिस्तानशी लढताना BSF चे मोहम्मद इम्तियाज यांना वीरमरण; कुटुंबावर शोककळा
कोल्हापूरच्या शिरोळ येथील अभिषेक मडिवाल यांनी सहा महिन्यांपूर्वीच नवीन इलेक्ट्रिक बाइक घेतली होती. ही बाईक घेऊन सांगलीच्या मालगाव येथे निघाले होते. या दरम्यान अंकली या ठिकाणी त्यांची गाडी अचानक बंद पडली, त्यानंतर संबंधित कंपनीशी संपर्क केला. मात्र तत्पूर्वीच थांबलेल्या गाडीने अचानक पेट घेतला. ज्यामध्ये संपूर्ण इलेक्ट्रिक बाइक जळून खाक झाली आहे.