8 days ago

हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी देखील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूचा मुद्दा गाजला. विरोधकांनी विधानसभेत दोन्ही मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही मुद्द्यांवर उद्या चर्चा ठेवल्याने विरोधक आक्रमक झाले आणि सभात्याग केला. दुसरीकडे आज उद्धव ठाकरेंनी नागपुरात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याचे अनेक अर्थही काढले जात आहेत. दुसरीकडे दिल्लीत लोकसभेत एक देश, एक निवडणूक विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. पुढे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे.

Dec 17, 2024 22:30 (IST)

Live Update : गेल्या अनेक वर्षापासून आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या सुनंदा मोकाशी यांचं निधन

गेल्या अनेक वर्षापासून आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या सुनंदा मोकाशी यांचं निधन

गेल्या अनेक वर्षापासून सुनंदा मोकाशी आझाद मैदान परिसरात झोपडीत वास्तव्यास होत्या.

तिथेच राहुन मैदानात त्या आंदोलन करायच्या.

पोलिसांना मोकाशी यांचा मृतदेह त्या राहत असलेल्या झोपडीत आढळून आलेला आहे.

Dec 17, 2024 22:26 (IST)

Live Update : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवरील प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवीन नावे पुढे येत असून त्यात सतेज बंटी पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे समजते.

Dec 17, 2024 22:23 (IST)

Live Update : अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर अंजली दमानियांचं ट्विट

Dec 17, 2024 21:53 (IST)

Live Update : काँग्रेस : नागपूरची बैठक संपली, निर्णय मात्र दिल्लीतच!

काँग्रेस : नागपूरची बैठक संपली, निर्णय मात्र दिल्लीतच!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, गटनेते पदाचा निर्णय दिल्लीतच होणार

नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीमधील बैठक संपली.

चेन्नीथला आपला अहवाल दिल्लीत पक्ष श्रेष्ठींना सादर करणार

त्यानंतर, नावे जाहीर करण्यात येणार

Advertisement
Dec 17, 2024 21:35 (IST)

Live Update : कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची अफवा

कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची अफवा 

उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फोन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल 

Dec 17, 2024 20:10 (IST)

Live Update : गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार नॉटरिचेबल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी आयोजित केलेल्या चहापानाला गैरहजेरी लावलीय. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार हे नॉटरिचेबल आहेत. अर्थमंत्रिपद हे भाजपा आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत. यावरून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जातंय. 

Advertisement
Dec 17, 2024 20:06 (IST)

Live Update : दोन भावांचा खेळता खेळता विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या आडूळ येथे शेतात दोन भावांचा खेळता खेळता विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत प्रणव कृष्णा फणसे या चार वर्षीय मुलाचा आणि त्याचा भाऊ जय कृष्णा फणसे वय आठ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढत त्यांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

Dec 17, 2024 19:33 (IST)

Live Update : काँग्रेस पक्षाच्या बैठकीला नागपुरात सुरुवात

काँग्रेस पक्षाच्या बैठकीला नागपुरात सुरुवात 

एआयसीसीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला नागपुरात पोहोचले असून ते काँग्रेस नेत्यांच्या भावना जाणून घेत आहेत.  काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार तसेच विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांच्या बैठकीत ते सहभागी झाले आहेत. बैठकीला सुरुवात झाली असून यात रमेश चेन्नीथला सर्वांचे ऐकून घेणार आहेत. नागपूर येथील काँग्रेस भवनात बैठकीला आरंभ झाला आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथ, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, तसेच नसीम सिद्दीकी यांच्यासह विद्यमान आमदार पराभूत उमेदवार बैठकीत सहभागी झालेले दिसत आहेत.

Advertisement
Dec 17, 2024 19:12 (IST)

Live Update : अर्नाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने उचललं टोकाचं पाऊल

अर्नाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

रतीकांत भद्रेशेट्टे (35) यांनी बोळीज येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल

आत्महत्येचा नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

Dec 17, 2024 18:33 (IST)

Live Update : राजभवनात थोड्याच वेळात चहापानाचा कार्यक्रम, अजित पवारांची दांडी

राजभवनात थोड्याच वेळात चहापानाचा कार्यक्रम, अजित पवारांची दांडी

राज्यपालांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहेय 

Dec 17, 2024 18:12 (IST)

Live Update : नाशिकमध्ये छगन भुजबळांची संघर्षसभा, मोठ्या निर्णयाची शक्यता

छगन भुजबळांची उद्या नाशिकमध्ये संघर्षसभा होणार आहे. मंत्रिपद डावलल्याने छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या उद्याच्या सभेला संघर्षसभा असं नाव देण्यात आलं आहे.  भुजबळ समर्थकांकडून या सभेचा टिझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 3 ऑक्टोबर 2016 ला भुजबळांना अटक केल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाची आठवण करून देत ओबीसींना पुन्हा एकजूट दाखवण्याची वेळ आल्याचा सरकारला इशारा देण्यात आला आहे. नाशिकच्या जेजुरकर मळा परिसरातील एका लॉन्सवर उद्या सकाळी राज्यभरातून आलेले भुजबळ समर्थक एकवटणार असल्याची माहिती आहे. 

Dec 17, 2024 17:05 (IST)

Live Update : भास्कर जाधवांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

भास्कर जाधवांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांकडे वन विधेयक स्थगित करण्याची विनंती केली होती, ती मान्य करण्यात आली. 

Dec 17, 2024 15:16 (IST)

Live Update : अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला...

अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट...

Dec 17, 2024 14:09 (IST)

एक देश, एक निवडणूक विधेयक लोकसभेत मंजूर

एक देश, एक निवडणूक विधेयक लोकसभेत मंजूर

विधेयकाच्या समर्थनार्थ 269 मते 

तर 198 मते विरोधात पडली

Dec 17, 2024 13:31 (IST)

आंतरजातीय विवाह केलेल्याजोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सुरक्षा देण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यात शासकीय विश्रामगृहावरील एक कक्ष आंतरजातीय विवाह केलेल्या आंतरधर्मीय जोडप्यांसाठी आरक्षित राहणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृहाची व्यवस्था केली जाणार आहे. हे सुरक्षागृह शासकीय विश्रामगृहात उपलब्ध करून दिले जाणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

Dec 17, 2024 13:09 (IST)

राज्यपाल अभिभाषणावर भास्कर जाधव यांच्या विधानावरून वाद

राज्यपाल अभिभाषणावर भास्कर जाधव यांच्या विधानावरून वाद 

राज्यपाल हे पक्षाचे सदस्य असतात हे विधान जाधव यांनी केले त्यावरून वाद 

अतुल भातखळकर यांनी हरकत घेत विरोध केला, राज्यपालांवर आरोप करणे चुकीचे- अतुल भातखळकर 

Dec 17, 2024 12:27 (IST)

महाविकास आघाडीमध्ये परभणी आणि बीडमधील प्रकरणांवरून मतभेद

महाविकास आघाडीमध्ये परभणी आणि बीड विषयावरून मतभेद. काँग्रेसचा सभात्याग तर उबाठा मात्र कामकाजात सहभागी. काँग्रेसने आजच्या पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार घातला तर याउलट उबाठा सर्व आमदार कामकाजात सहभागी. परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. तर बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या दोन्ही प्रकरणी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. मात्र अध्यक्षांनी हे स्थगन फेटाळले, त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. 

विधान सभेचया आजच्या कामकाजावर बहिष्कार

Dec 17, 2024 11:16 (IST)

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येचे विधानसभेत पडसाद

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येचे विधानसभेत पडसाद

वाल्मिकी कराड याच्यावर कारवाई करावी  

सरकार यात गंभीर नाही यावरून विरोधकांचा सभात्याग

Dec 17, 2024 10:57 (IST)

मंत्रिपद मिळाली नाही त्यांनी सध्या श्रद्धा आणि सबुरीचा अवलंब करावा- प्रताप सरनाईक

मंत्रिपदावरुन नाराज शिवसेना आमदारांना उद्देशून प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, मी देखील तीन टर्मचा आमदार आहे. माझं नाव देखील अनेकदा चर्चेमध्ये यायचं मात्र मंत्रिपद मिळालं नाही. मला कुटुंबीयांना थोडी नाराजी वाटायची. पण याचा अर्थ आम्ही ती नाराजी बोलून दाखवली असं नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद मिळाली नाही त्यांनी सध्या श्रद्धा आणि सबुरीचा अवलंब करावा, असा सल्ला देखील प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.  

एकनाथ शिंदेंचाही विचार करायला पाहिजे. ते देखील मुख्यमंत्री होते त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलं ते देखील कुठेतरी नाराज असतीलच. मी सगळ्यांशी बोललो आहे, सगळ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतोय, असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.

Dec 17, 2024 10:32 (IST)

उद्धव ठाकरे आज विधानपरिषदेत उपस्थित राहणार असल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीच्या आधी शिवसेना आमदारांची बैठक 

विधानभवनात सर्व शिवसेना आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश 

आज उद्धव ठाकरे देखील विधानपरिषदेत उपस्थित राहणार असल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता 

त्यामुळे पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी तसेच काही महत्त्वाचे मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बोलवली आमदारांची बैठक

Dec 17, 2024 08:56 (IST)

नाशिकसह निफाडमध्ये आज यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद

नाशिकसह निफाडमध्ये आज यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद,  निफाडमध्ये 5.7 तर नाशिकमध्ये 8 अंश सेल्सिअस अंश तापमानाची नोंद, कडाक्याच्या थंडीने नाशिककर गारठले , पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज.

Dec 17, 2024 08:31 (IST)

अकॅडमी प्रमुखाचे अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, कोल्हापूरच्या करवीर येथील घटना

अकॅडमी प्रमुखाचे अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील धक्कादायक प्रकार, शिष्यवृत्ती परीक्षा आणि केंद्रीय शाळा प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या अकॅडमीतील घटना,  पीडित मुलाने पालकांना उशीरा दिली माहिती, पालकांची करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, अकॅडमी प्रमुख प्रदीप कृष्णात नलवडे याच्यावर बाल लैंगिक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल

Dec 17, 2024 07:49 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज 17 डिसेंबरला सुनावणी. पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस आणि NCP शरदचंद्र पवार पक्ष हे नाव कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे.

Dec 17, 2024 07:37 (IST)

रत्नागिरीतील वायूगळतीचा 5 दिवसांनंतर परिणाम, मुलांसह मोठ्यांना त्रास, अनेकजण ICU मध्ये भरती

रत्नागिरीतील जिंदाल कंपनीतील वायुगळतीचा 5 दिवसानंतर मोठ्या माणसांवर दिसू लागला परिणाम. बाधित झालेल्या मुलांना परत एकदा त्रास होत असल्याचे समोर येत असतानाच मोठ्यांना झाला त्रास सुरू. मुलांपाठोपाठ तीन जण प्रौढ खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल, आकडा वाढण्याची शक्यता. पुन्हा परिणाम दिसू लागल्याने पंचक्रोशीत भीतीचे वातावरण, काल दुपारनंतर मुलांच्या संख्येत देखील वाढ.आतापर्यंत 19 मुलांना केलं खासगी रुग्णालयात दाखल. 

Dec 17, 2024 06:49 (IST)

हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ येवला मतदारसंघात

मंत्रिमंडळातून डावलले गेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत.  सकाळी 11 वाजता येवला येथील संपर्क कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षपदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटणार आहे. भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्या गेल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. तर भुजबळ यांनीही नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून "जहा नही चैना  वहा नही रहेना" असे  सूचक विधान केले होते. 

Dec 17, 2024 06:47 (IST)

विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज विधानपरिषदेच्या रिक्त सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या सभापती पदासाठी निवड नेमकी कुणाची होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.  विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजप आग्रही आहे. राम शिंदे यांचे नाव यासाठी चर्चेत आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील पदासाठी इच्छुक आहे. शिवसेनाकडून विद्यमान उपसभापती निलम गोरे आग्रही आहेत.