Budget 2026: ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय? अर्थमंत्री निर्मला सीतारमण याबाबत नेमकं काय म्हणाल्या?

अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब उघडल्या जाणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी २०२६-२७ चा बजेट सादर केला. या बजेटमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये एक घोषणा ऑरेंज इकॉनॉमीशी संबंधित आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब उघडल्या जाणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी याबाबत घोषणा करताना सांगितलं की, भारतात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स सेक्टर जलद गतीने वाढत आहे आणि ५०० कॉलेजमध्ये AVGC कंटेन्ट क्रिएटर लॅब सेट अप करेल. 

हा प्रस्ताव आर्थिक सर्व्हे २०२५-२६ मध्ये दिलेल्या नोट्सवर आधारित आहे. ज्यामध्ये कल्चर, मिडिया, एन्टरटेनमेंट आणि इंटेलेक्युअल प्रॉपर्टी सारख्या क्रिएटिव्ह सेक्टर रोजगार, शहरी सेवा आणि पर्यटनाला चालना देता येते. याला "ऑरेंज इकॉनॉमी" म्हणतात.

Advertisement

ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय?

हा शब्द प्रथम कोलंबियाचे माजी अध्यक्ष इवान ड्यूक मार्केझ आणि माजी सांस्कृतिक मंत्री फेलिप बुइट्रागो यांनी वापरला होता. केशरी रंग हा जगातील सांस्कृतिक आणि सर्जनशील क्षमतेचे प्रतीक आहे, असा त्यांचा युक्तिवाद होता. जेव्हा आपण चित्रपट, संगीत, खेळ, फॅशन, थिएटर, डिझाइन आणि हस्तकला यासारख्या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपण स्वत:बद्दल बोलत असतो. एक असं जग जिथं स्वप्न पाहणारे, निर्माते आणि बदल घडवणारे एकत्र काम करतात. थोडक्यात...अशी अर्थव्यवस्था जी सर्जनशीलता, कला, संस्कृती, मीडिया, डिझाइन, चित्रपट, संगीत, सॉफ्टवेअर, फॅशन आणि मनोरंजन भरभराटीला येते. याला सर्जनशील अर्थव्यवस्था असेही म्हणतात. 

नक्की वाचा - Budget 2026: अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं ? मीम्सचा पाऊस; पाहाल तर हसून हसून गडाबडा लोळाल

ही अर्थव्यवस्था किती मोठी आहे?

संयुक्त राष्ट्रांच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमी आउटलुक २०२४ च्या अहवालात असंही म्हटलं जात आहे की, ही अर्थव्यवस्था दरवर्षी २ ट्रिलियन डॉलर्सचे उत्पन्न निर्माण करते आणि जगभरात ५ कोटी लोकांना रोजगार देते. भारतातील सर्जनशील अर्थव्यवस्था ३० अब्ज डॉलर्सची आहे. भारतातील आठ टक्के नोकऱ्या या अर्थव्यवस्थेतून निर्माण होतात.

संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे की, सध्या जगभरात  रोजगाराच्या ३.१ टक्के रोजगार ऑरेंज इकॉनॉमीद्वारे निर्माण होत आहे. २०३० पर्यंत हा वाटा १०% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात ऑरेंज इकॉनॉमी देखील वेगाने वाढत आहे.