जाहिरात

Budget 2026: अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं ? मीम्सचा पाऊस; पाहाल तर हसून हसून गडाबडा लोळाल

Sensex And Nifty Today: रविवारी सेन्सेक्स जवळपास 1546 अंकांनी तर निफ्टी जवळपास 495 अंकांनी कोसळला होता.

Budget 2026: अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं ? मीम्सचा पाऊस; पाहाल तर हसून हसून गडाबडा लोळाल
मुंबई:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी (रविवार) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात फ्युचर अँड ऑप्शनवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स 0.02% वरून 0.05 % करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेअर बाजारात हलकल्लोळ माजला असून, रविवारी सेन्सेक्स जवळपास 1546 अंकांनी तर निफ्टी जवळपास 495 अंकांनी कोसळला होता. हीच बातमी आज ठळकपणे दिसत होती. यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना  काय मिळाले या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, मात्र त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. हाच प्रश्न विचारत सोशल मीडियावर विविध पोस्ट पाहायला मिळत होत्या. बजेटवरून बरेच मीम्स तयार होत असून त्यातले काही निवडक मीम्स आपण पाहूयात. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com