2 days ago

आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. राज्यात अमानुष मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओवरुन सभागृह तापण्याची शक्यता आहे. जालन्यातील भोकरदन आणि बीडमधील शिरुर येथे झालेल्या या मारहाणीच्या घटनांचे पडसाद आज विधानभवन परिसरात उमटू शकतात. विरोधक या दोन्ही घटनांवरुन आक्रमक होण्याची शक्यता आहे. बीडच्या मस्साजोगमधील संतोष देशमुख यांच्या हत्येआधी केलेल्या अमानुष मारहाणीसारख्याच आणखी दोन मारहाणीच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  
 

Mar 06, 2025 22:13 (IST)

Bhandara Accident: भंडाऱ्यात ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात, चिमुकलीचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या वरठीतील रेल्वे पुलावर भीषण अपघात घडला. यात एका भरधाव ट्रकने पुलावरून जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार एकता बालु सेलोकर राहणार एकलारी या सात वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक तिचे वडील बालु सेलोकर व विर कन्हैया मारवाडे वय ७ वर्ष हा मुलगाही गंभीर जखमी झाले आहेत. 

Mar 06, 2025 21:16 (IST)

LIVE UPDATE: पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याचे समोर आले आहे. पंकजा मुंडे यांनी स्वतः धनंजय मुंडेंची भेट घेतली असून दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

Mar 06, 2025 21:00 (IST)

Pune News: स्वारगेट अत्याचार प्रकरण: तरुणीची बदनामी थांबवण्याबाबतची याचिका फेटाळली

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील ॲड असीम सरोदे यांनी केलेली याचिका कोर्टाने फेटाळली

स्वारगेट अत्याचार प्रकरणांमध्ये महिलेची बदनामी करणारे वक्तव्य आणि बातम्या येत असल्याने दाखल केली होती याचिका

सदरची याचिका आम्ही फेटाळत असल्याचं कोर्टाने आदेशात म्हटलेलं आहे

सूचना देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे असल्याचं कोर्टाच निरीक्षण नोंदवले

त्यामुळे असिम सरोदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला दाखल

Mar 06, 2025 20:14 (IST)

Pune News: संतोष देशमुख यांना न्याय द्या! इंदापुरात कॅन्डल मार्च

पुण्याच्या इंदापूर मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी मुख्य बाजारपेठेतून कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. या कॅन्डल मार्चमध्ये हातात होर्डिंग घेऊन तरुण-तरुणींसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी "अमर रहे अमर रहे,संतोष देशमुख अमर रहे" आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा पद्धतीची घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement
Mar 06, 2025 20:02 (IST)

MLA Meeting: मुंबईत मविआची बैठक: शरद पवार, उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांची उपस्थिती

राज्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक होत असून या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

या बैठकीला शरद पवार, रोहित पवार, रोहित पाटील, मिलिंद नार्वेकर चौधरी, जयंत पाटील, यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित झाले आहेत. 

Mar 06, 2025 18:25 (IST)

Nashik News: नाशिकमध्ये बांधकाम साहित्याच्या शेडला आग; तीन लाखांचे नुकसान

नाशिक ब्रेकिंग...

- नाशिकच्या पंचवटी परिसरातील गणेश नगर परिसरात बांधकाम साहित्याच्या शेडला आग...

- पंचवटी अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल 

- आगीचे कारण अस्पष्ट मात्र लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक...

- अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश, परिस्थिती नियंत्रणात...

- गणेशवाडी परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

Advertisement
Mar 06, 2025 17:31 (IST)

Pune News: पुण्यात मनसेचे आंदोलन, महापालिकेविरोधात आक्रमक

पुण्यात मनसेच आंदोलन 

महापालिकेच्या विरोधात मनसेच पुण्यात आंदोलन 

महापालिकेच्या खेळाची मैदानाची झालेली दुरावस्था झाल्याचा मनसेचा आरोप 

महापालिका आवारात क्रिकेट खेळत मनसेसकडून निषेध आंदोलन

Mar 06, 2025 17:15 (IST)

LIVE UPDATE: मंगळवेढ्यात लिंगायत धर्मगुरूंना मारहाण

भाजप आमदारांच्या मतदार संघात असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात मठाच्या वादातून एका शिवाचार्य स्वामी यांना मारहाण करण्यात आली आहे. तोफकट्टी संस्थान मठाचे मठाधिपती राचोटेश्वर शिवाचार्य महास्वामी  यांना मठात आपण घुसला आहेत. असे म्हणत सहा लोकांनी लोखंडी गजाने मारहाण केली आहे. याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्यात शिवाचार्य महास्वामी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संतभूमी मंगळवेढ्यात साधू , संत, शिवाचार्य यांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Mar 06, 2025 17:15 (IST)

Beed News: सतीश भोसलेवर 24 तासात दुसरा गुन्हा: ढाकणे कुटुंब दहशतीखाली

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता पुत्राला सतीश भोसले व त्याच्या इतर साथीदारांनी मारहाण केल्याची घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली होती या प्रकरणात आता शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. या प्रकरणात सतीश भोसले व त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याने ढाकणे कुटुंब प्रचंड दहशतीखाली असून आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे तर दुसरीकडे सतीश भोसले यांच्या हक्कावर कारवाई करावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.. दरम्यान या दोन्ही होण्याच्या प्रकरणात पोलिसाचा सतीश भोसलेच्या शोधात आहेत..

Mar 06, 2025 15:12 (IST)

Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: आज गंगाखेड बंद

   बिड जिल्हातील मस्साजोग येथिल सरपंच संतोष देशमुख यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येतील सर्व आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी अखंड मराठा समाजाने आज गंगाखेड बंदचे आवाहन केले होते. व्यापा-यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर शहर कडकडीत बंद ठेवले तर या हत्येच प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान अखंड मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निषेध रॅली काढली, या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवकांनी सहभाग घेतला होता, रॅली दरम्यान निषेधाच्या घोषणा देत तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांना निवेदन देण्यात आले आहे...

Mar 06, 2025 14:43 (IST)

Washim News: गव्हाच्या सोंगणीदरम्यान मधमाशांचा हल्ला, 4 मजूर जखमी

वाशिम च्या कारंजा तालुक्यातील गायवळ शेत शिवारात गहू सोंगत असतांना मधमाशांनी हल्ला केला.या हल्ल्यात 4 मजूर गंभीर जखमी झाले असून गायवळ ग्रामस्थांनी 4 ही मजुरांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.या सर्व मजुरांवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून 4 पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.गव्हाची सोंगणी करतांना मधमाशांच्या अचानक झाल्याने गायवळ शिवारातील मजुरांमध्ये भीती पसरली आहे.

Mar 06, 2025 13:30 (IST)

Live Update : कोण भैय्याजी जोशी? ते मुंबई येऊन असं कसं म्हणू शकतात? मराठीच्या मुद्द्यावरुन भाई जगताप संतापले!

भैय्याजी जोशी नेमकं काय म्हणाले?

मुंबईत आरएसएसचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी विद्याविहार येथील एका कार्यक्रमादरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना हे वक्तव्य केलं आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा त्या कार्यक्रमात उपस्थित होते. ते म्हणाले, मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. पण त्या त्या भागाची एक भाषा असते. गिरगावात मराठी बोलणारे जास्त मिळतील.   तर घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत.

Mar 06, 2025 13:14 (IST)

Live Update : 'मुंबईत राहणाऱ्याला मराठी यायलाच पाहिजे', भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गोंधळ

भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गोंधळ

गुजराती मतं खेचण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. 

'मुंबईत राहणाऱ्याला मराठी यायलाच पाहिजे', भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गोंधळ

Mar 06, 2025 12:26 (IST)

Live Update : महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा बोलली पाहिजे आणि शिकली पाहिजे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भैय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते ऐकून, माहिती घेऊन बोलेन. मुंबईची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा बोलली पाहिजे आणि शिकली पाहिजे. इतरही भाषांचा इथं सन्मान. कोणत्याही भाषेचा अवमान आम्ही करणार नाही. शासनाची भूमिका पक्की मराठी आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mar 06, 2025 12:11 (IST)

Live Update : आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, रोहित पवार, लय भारी वेब पोर्टल संपादक तुशार खरात यांच्यावर हक्कभंग मांडण्यात आला. संजय राऊत यांनी खोटी माहिती छापली, बदनामी केली. त्याचवेळी रोहित पवार यांनी सभागृहाबाहेर याबाबच विधान केलं. त्याशिवाय माझ्याबद्दल चुकीची माहिती दाखविण्यात आली आहे. न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. तरीही माझ्याविरोधात चुकीची, बिनबुडाची वक्तव्य करण्यात आली, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी विधानसबेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला.  

Mar 06, 2025 11:59 (IST)

Live Update : खोक्या भोसले हा सुरेश धस यांचा एकदम खास कार्यकर्ता, लक्ष्मण हाके यांचा आरोप

सतीश भोसले प्रकरणावरून लक्ष्मण हाके यांची सुरेश धस यांच्यावर टीका करण्यात आली. खोक्या भोसले हा सुरेश धस यांचा एकदम खास कार्यकर्ता आहे. भोसले हा धसांच्या पहिल्या पाच कार्यकर्त्यांमधील एक आहे. लक्ष्मण हाके यांचा आरोप.  

सुरेश धस निवडणुकीला उभे असताना दीडशे गाड्यांचा ताफा घेऊन हा भोसले येत असत. सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आका हा शब्द दिला , सुरेश धस यांनी आता आता हा शब्द आपल्याला लावून घ्यावा या खोक्या भोसलेचा आका  नेमका कोण आहे

Mar 06, 2025 10:51 (IST)

Live Update : लवकरच मुंबईकरांसाठी बाईक टॅक्सीची सेवा, या महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता

तरुण-तरुणींना रोजगार मिळावा, प्रवासाचा खर्च कमी व्हावा यासाठी देशाच्या 22 राज्यांमध्ये बाईक टॅक्सी सुरू आहे. या महिन्यातच बाईक टॅक्सीला मंजुरी मिळेल. गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण पाहता तरुणी-तरुणीला त्रास होऊ नये यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील, या राज्यातील 10 ते 20 हजार तरुण-तरुणींना रोजगार मिळविण्यासाठी हे महत्त्वाचं. 

Mar 06, 2025 10:24 (IST)

Live Update : पीडित महिलेने जयकुमार गोरेंविरोधातील पत्र फेब्रुवारी महिन्यात राज्यपालांना दिलंय - अंबादास दानवे

जयकुमार गोरेंकडून विनयभंग करण्यात आलेल्या पीडित महिलेने फेब्रुवारी महिन्यात राज्यपालांना तक्रारीचं पत्र दिलं आहे. - अंबादास दानवे

Mar 06, 2025 10:00 (IST)

Live Update : गेल्या चार महिन्यात एकमेकांची जिरवण्यात नेते आणि आमदार व्यस्त - रोहित पवार

गेल्या चार महिन्यात एकमेकांची जिरवण्यात नेते आणि आमदार व्यस्त, याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय.

Mar 06, 2025 09:47 (IST)

Live Update : तुळसणीत आढळले बिबट्याचे दोन बछडे

पाणी साठवण करण्यासाठी तयार केलेल्या एका हौद्यात बिबट्याचे दोन बछडे सापडल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी सुर्वेवाडीत उघडकीस आली. याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर तीन तासांच्या मोहिमेनंतर बछड्यांना सुरक्षित पिंजऱ्यात घेण्यात आलं. ही मोहीम काल सायंकाळी उशिरा राबविण्यात आली.

Mar 06, 2025 08:56 (IST)

Live Update : इंडिया आघाडी आज प्रशांत कोरटकर विरोधात निदर्शने करणार

इंडिया आघाडी आज प्रशांत कोरटकर विरोधात करणार निदर्शने 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून करणार जवाब दो आंदोलन 

कोरटकर यांच्या अटकेची मागणी करणार 

दरम्यान आज आंदोलनदरम्यान इंडिया आघाडीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची धरपकड होण्याची शक्यता

Mar 06, 2025 08:05 (IST)

Live Update : पुण्यात येत्या तीन महिन्यांत सीएनजीवरील 600 बस घेण्याचा निर्णय

पुणे महानगर परिवहन महामंडळाने येत्या तीन महिन्यांत सीएनजीवरील 600 बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी सरकारी-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील 400 बस पुढील महिन्यात पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तर स्वमालकीच्या 200 बस जून महिनाअखेरपर्यंत मिळणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

Mar 06, 2025 08:02 (IST)

Live Update : अबू आजमी यांच्या वक्तव्यावर प्रचंड संताप, केडगावमध्ये तीव्र आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी औरंगजेबाच्या गौरवगाथेचे उद्गार काढताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. नगरकरांनी याविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले असून, केडगाव येथे सामाजिक कार्यकर्ते सुरज कोतकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शिवभक्तांनी आजमी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून रोष व्यक्त केला. या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत आंदोलकांनी अबू आजमी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आणि शासनाने तत्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा नगर-पुणे महामार्ग रोखून अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा दिला. 

Mar 06, 2025 08:00 (IST)

Live Update : बुलढाण्‍यातील केसगळतीबाबत सरकारचा अभ्‍यास सुरू, असे प्रकार थांबवण्‍यासाठी पावले उचलणार

बुलढाणा जिल्‍हयातील केस गळतीबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अभ्यास सुरू आहे. आय सी एम आर त्यावर संशोधन करतंय .त्यांचा अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक बोलता येईल, मात्र भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी पावले उचलली जातील असं आरोग्‍यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं.

Mar 06, 2025 07:24 (IST)

Live Update : आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार मार्गदर्शन करणार

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.