जाहिरात

Buldhana News: झोपेतून उठताच ॲसिडिटी, 21 वर्षीय तरुणी अस्वस्थ, पुढं जे घडलं.. गावावर शोककळा!

गावातील रवींद्र शेषराव सानप यांची 19 वर्षीय मुलगी कुमारी साक्षी ही आई-वडिलां समवेत झोपली होती. शुक्रवारी रात्री झोपेत असतानाच साक्षीला सापाने चावा घेतला. 

Buldhana News: झोपेतून उठताच ॲसिडिटी, 21 वर्षीय तरुणी अस्वस्थ, पुढं जे घडलं.. गावावर शोककळा!

अमोल सराफ, बुलढाणा: 

Buldhana News:  सध्या बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मुख्यतः ग्रामीण भागात अर्धवट ऊन, दमट वातावरण सकाळी थंड वारा असं वातावरण पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलाचा जसा माणसावर परिणाम होतो, तसाच प्राण्यांवरही होतो. प्रामुख्याने उन्हाळ्यामधील हे वातावरण सापांसाठी त्रासदायक ठरते. त्यांना बिळामध्ये अस्वस्थता वाटते त्यामुळे ते मिळेल तिथे आसरा घेतात, त्यामुळे सर्पदंशाच्या घटना वाढतात. अशीच दुर्दैवी घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे.

Mumbai Crime: तरुणाचा विकृत छंद! उच्चभ्रू सोसायटीत जायचा, सुंदर तरुणी हेरायचा अन्...मुंबईतील भयंकर प्रकार

तरुणीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

19 वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावातील रवींद्र शेषराव सानप यांची 19 वर्षीय मुलगी कुमारी साक्षी ही आई-वडिलां समवेत झोपली होती. शुक्रवारी रात्री झोपेत असतानाच साक्षीला सापाने चावा घेतला. 

दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी उठल्यानंतर तिच्या घशामध्ये दुखत असल्याने तसेच तिला  ऍसिडिटी सदृश्य त्रास होत असल्याने तात्काळ लोणार येथे रुग्णालयात नेण्यात आले. लोणारे येथे उपचार सुरू असताना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने व सर्पदंशाची लक्षणे दिसून आल्याने मेहकर येथे पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र पुढे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यामध्येच तिचा दुर्दैवी अंत झाला. 

साक्षीच्या मृत्यूनंतर साप शेजारच्या अंगणात आढळून आला ज्यानंतर याप्रकरणाचा खुलासा झाला. साक्षी ही सुलतानपूर येथील बी फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती.तिच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोक काळा पसरली. वैद्यकीय तपासणीनंतर  शोकाकुळ वातावरणात तिला अखेरचा निरोप देण्यात आला. तिच्या पश्चात आई-वडील बहिण ,भाऊ ,आजी आजोबा काका काकी असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Shocking news: लाईक्सच्या हव्यासात सीमा ओलांडली! पोलिसांनी ‘रीलस्टार'ला लायकी दाखवली

 उन्हाळ्यात घराबाहेर झोपताना काय काळजी घ्यावी? 

  • परिसर स्वच्छ ठेवा: घराभोवती कचरा, लाकडाचे ढिगारे, जुन्या विटा किंवा दगड साचू देऊ नका, कारण साप अशा थंड आणि सुरक्षित ठिकाणी लपतात.
  • झाडेझुडपे कापा: घराच्या आसपास गवत किंवा झाडेझुडपे वाढली असल्यास ती नियमितपणे कापा.
  • दरारे बंद करा: घराच्या भिंतींना तडे किंवा दरारे असल्यास ते सिमेंटने भरून टाका, जेणेकरून साप घरात शिरणार नाहीत.
  • उंदीर नियंत्रण: साप उंदरांच्या शोधात येतात, त्यामुळे घरात उंदीर होणार नाहीत याची काळजी घ्या. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com