जाहिरात

Buldhana News: वर्दीचं स्वप्न अधुरं! भरतीच्या मैदानात धावता धावता श्वास थांबला; एकुलत्या एका मुलाचा मृत्यू

पुरुषोत्तमने दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या, मात्र तिसऱ्या फेरी धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. 

Buldhana News: वर्दीचं स्वप्न अधुरं! भरतीच्या मैदानात धावता धावता श्वास थांबला; एकुलत्या एका मुलाचा मृत्यू

अमोल सराफ, बुलढाणा:

Pune Police Bharati Candidate Death:  खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून पोलीस भरतीत उतरलेल्या युवकाचा धावता धावता मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पुणे येथे सुरु असलेल्या पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. पुरुषोत्तम भीमराव बुरुकुल असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील राहणारा होता.  दोन बहिणींचा लाडका भाऊ, आई- वडिलांचा एकुलता एक आधार हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

आईच्या हत्येत पित्याला तुरुंगवास, निराधार भाचींचा 2 मामांनीच केला घात! सख्ख्या बहिणींसोबत भयंकर घडलं

धावता धावता श्वास थांबला, वर्दीचं स्वप्न अपूर्ण! 

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस होण्याचे स्वप्न डोळ्यात साठवून मैदानावर उतरलेल्या मुलाचा पुणे येथील पोलीस भरती दरम्यान मृत्यू झाला. तो देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बोरे येथील रहिवासी होता. पुरुषोत्तम हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील काही वर्षापासून आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत, त्यामुळे दोन बहिणी, आई- वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. 

कुटुंबाला आधार देण्याचं, पोलीस होण्याचं स्वप्न बाळगून तो पुणे येथील पोलीस भरतीत उतरला होता. 1600 मीटर धावण्याच्या या कठीण शर्यतीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटणारा पुरुषोत्तम अखेर तिसऱ्या राऊंडमध्ये कोसळला आणि आयुष्याची शर्यत हरला. पुरुषोत्तमने दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या, मात्र तिसऱ्या फेरी धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. 

Weather Update: सावधान! शेतकऱ्यांसाठी पुढील 4 दिवस धोक्याचे, पिकांना जपा, अलर्ट रहा, काय आहे संकट?

कुटुंबाचा आधार गेला.. ! 

उपस्थितांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले पण  उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या मते त्याला फिट सारखा झटका आल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पुरुषोत्तमच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. पोलीस बनून घर उभे करायचे यासाठी पुरुषोत्तम दिवस रात्र मेहनत करत होता, मात्र नियतीने त्याचा घात केला. या घटनेने बहिणीच्या डोळ्यातील अश्रू, आईचा हंबरडा आणि वडिलांची निशब्द वेदना पाहून गावकरीही भावुक झाले. या घटनेने चिंचोली बुरकुल गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com