Buldhana News : 3 वर्षे हॉटेलच्या काऊंटरखाली दबलेलं होतं भीषण रहस्य; पोलिसांच्या एका टीपने मोठा खुलासा

थरारपटालाही मागे टाकेल असा वास्तवातील भयानक गुन्हा बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana News : थरारपटालाही मागे टाकेल असा वास्तवातील भयानक गुन्हा बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात उघडकीस आला आहे. सुकळी येथील ३४ वर्षीय विनोद नवले हा तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. पोलिसांकडूनही त्याचा शोध घेतला जात होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे कुटुंबीयही विनोदच्या प्रतीक्षेत होते. मात्र आज तीन वर्षांनंतर विनोदबद्दल एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनोदचा खून करून त्याचा मृतदेह चक्क जामगाव शिवारातील एका चालू ढाब्याच्या काउंटरखाली पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील जाधव (मुख्य आरोपी) आणि विनोद नवले हे मित्र होते. पण पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून सुनीलने खुनाचा कट रचला. जामगाव शिवारातील बाबूभाई कुरेशी यांच्या शेतात सचिन उगले याने ढाबा सुरू केला होता. सचिनने सुनीलकडून कर्ज घेतलं होतं. मात्र हे कर्ज फेडता न आल्याने सुनीलने त्याच्यासमोर एक वेगळीच अट ठेवली. एका व्यक्तीचा काटा काढण्यात मदत कर, कर्ज माफ करतो अशी सुनीलने  अट घातली होती. यानंतर सुनील आणि सचिनने एक प्लान आखला. 

Advertisement

नक्की वाचा - Solapur News : सोलापूर-पुणे-कोल्हापुरातील 34 अल्पवयीन मुलींची धक्कादायक प्रकरणं उघड;डॉक्टरही भयंकर प्लानचा भाग

रिअल लाईफ दृश्यम प्रकरण

तीन वर्षांपूर्वी एके रात्री विनोदला ढाब्यावर बोलावण्यात आलं. तिथे तिघांनी मिळून दारू पार्टी केली. यानंतर विनोदची निघृणपणे हत्या करण्यात आली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी विनोद मृतदेह ढाब्याच्या कॅश काउंटरखाली पुरणात आला. विशेष म्हणजे, त्याच ठिकाणी तीन वर्षे व्यवहार सुरू राहिला, पण कोणालाही संशय आला नाही. आज २१ एप्रिल रोजी पोलिसांनी टीप मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन केलं असता, मृतदेहाचे अवशेष सापडले आणि या रिअल लाईफ दृश्यम प्रकरणाचा पर्दाफाश झाला. तीन वर्षांपासून जमिनीखाली दडलेलं सत्य अखेर बाहेर आलं असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे संपूर्ण मेहकर तालुका हादरला आहे. सत्य कितीही भूतळात दडवलं असलं तरी ते बाहेर येतंच हे पुन्हा सिद्ध झालं आहे.