Police Recruitment : महाराष्ट्र पोलिसात बंपर भरती; अर्ज करण्याची मुदत वाढवली, 50 हजारांहून अधिक पगार!

पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bumper recruitment in Maharashtra Police : पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. पोलीस भरतीत अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी १५,६३१ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्जाची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर होती. मात्र आता यात वाढ करून ७ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. जर तुम्हीही पोलिसात नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 

ही भरती १५,६३१ पदांसाठी आहे. यामध्ये कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, एसआरपीएफ कॉन्स्टेबल आणि पोलीस बँडमॅड सारख्या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी उमेदवारांना बारावी पास आवश्यक आहे. याशिवाय वयोमर्यादा १८ ते २८ वर्षांपर्यंत असावी. SC, ST, OBC आणि अन्य आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल. 

किती असेल पगार?

उमेदवारांना सुरुवातील २१,७०० रुपये ते ६९,१०० (वेतन पातळी - ३)दरम्यान मिळेल. सुरुवातीला २८,००० ते ३२,००० रुपये पगार हातात मिळेल, याशिवाय महागाई भत्ता एचआरए आणि अन्य सरकारी भत्तादेखील मिळू शकतात. ज्यामुळे एकूण पगारात वाढ होईल. 

Advertisement

नक्की वाचा - IIT Placement : IIT प्लेसमेंटमधून 20 कंपन्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; विद्यार्थ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय

निवड प्रक्रिया कशी असेल?

अनेक टप्प्यांनंतर निवड प्रक्रिया पूर्ण होईल. सर्वात आधी उमेदवाराची मैदानी आणि शारिरीक दक्षता परीक्षे घेतली जाईल. यानंतर लिखित परीक्षा होईल. विशेषत: ड्रायव्हर पदासाठी ड्रायव्हिंग स्किल चाचणी केली घेतली जाईल. सर्व टप्पे पार केल्यानंतर कायदपत्र तपासणी आणि मेडिकल चाचणी होईल. 

सामान्य किंवा ओपन वर्गाच्या उमेदवारांसाठी अर्जाचा शुल्क ४५० रुपये ठेवण्यात आला आहे. तर आरक्षित वर्ग SC, ST, OBC उमेदवारांना ३५० रुपये द्यावे लागतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइट mahapolice.gov.in वर Apply Online लिंकवर क्लिक करा आणि नवं रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशननंतर अर्जाचा फॉर्म भरा. आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि अर्जाचे शुल्क जमा करा. शेवटी फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची पीडीएफ कॉपी डाऊनलोड करा. 

Advertisement