Central Railway AC Local : राज्यभरात उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईकरांना तर घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. सकाळी 10-11च्या सुमारास सूर्य आग ओकू लागतो. त्यात अंगातून घामाच्या धारा वाहत असतात. त्यामुळे नोकरदारवर्गाला दररोजचा लोकल प्रवास हा मोठा टास्क वाटू लागला आहे. दरम्यान मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलची संख्या वाढविण्यात आली आहे. बुधवार, 16 एप्रिलपासून मध्य रेल्वेवर अधिक संख्येने एसी लोकल धावणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या मध्य रेल्वेवर केवळ सहा एसी लोकल आहेत. त्यातील पाच एसी लोकल ६६ फेऱ्या पूर्ण करतात. त्याशिवाय एक अंडरस्लंग एसी लोकल असते. आता एसी लोकलमध्ये वाढ करण्यात येणार आहे. एक एसी लोकल वाढल्यामुळे मध्य रेल्वेवरील एसी लोकलची संख्या सातपर्यंत जाईल. त्यामुळे फेऱ्यांमध्ये वाढ होईल.
नक्की वाचा - घरात CCTV कॅमेरा असेल तर सावधान राहा! तुमच्यासोबत घडू शकते मोठी दुर्घटना, पाहा VIDEO
नव्या एसी लोकलचे वेळापत्रक
अप मार्गावर | डाऊन मार्गावर |
कल्याण-CSMT : 7.34 सकाळी | विद्याविहार ते कल्याण : 6.26 सकाळी |
बदलापूर ते CSMT : 10.42 सकाळी | CSMT ते बदलापूर : 9.09 सकाळी |
ठाणे ते CSMT : 1.28 दुपारी | CSMT ते ठाणे : 12.24 दुपारी |
ठाणे ते CSMT : 3.36 दुपारी | CSMT ते ठाणे : 2.29 दुपारी |
ठाणे ते CSMT : 5.41 सायंकाळी | CSMT ते ठाणे : 4.38 सायंकाळी |
ठाणे ते CSMT : 7.49 सायंकाळी | CSMT ते ठाणे : 6.45 सायंकाळी |
बदलापूर ते CSMT : 11.04 रात्री | CSMT ते बदलापूर : 9.08 रात्री |