Mumbai Local News: मुंबईकरांचे हाल! एक्सप्रेसमध्ये मोठा बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; वाचा अपडेट

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिस गाठण्याची घाई झालेल्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वे मार्गावर झालेल्या बिघाडामुळे ऑफिसला पोहोचण्यास उशिर होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Local Train Central Railway technical Issue: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिस गाठण्याची घाई झालेल्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वे मार्गावर झालेल्या बिघाडामुळे ऑफिसला पोहोचण्यास उशिर होणार आहे.  मध्य रेल्वे मार्गावरील आसनगाव (Asangaon) आणि वासिंद (Vashind) या दोन स्थानकांदरम्यान एका एक्स्प्रेस गाडीमध्ये गंभीर स्वरूपाचा तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळेत या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे.

आसनगाव- वासिंद स्थानकांदरम्यान बिघाड

समोर आलेल्या माहितीनुसार, आसनगाव-वासिंद पट्ट्यात झालेल्या या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या अप (Up) आणि डाऊन (Down) अशा दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर थेट परिणाम झाला आहे. लोकल (Local) आणि लांब पल्ल्याच्या (Long Distance) गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.  

एरवी ५ ते १० मिनिटे उशिराने धावणाऱ्या गाड्या आज जास्तच उशिराने धावत असल्याने, शाळा-कॉलेज आणि कार्यालयात वेळेवर पोहोचण्याच्या घाईत असलेल्या मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली आहे. कामावर वेळेत पोहोचण्यासाठी निघालेल्या लाखो प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर 4 दिवसांचा मेगाब्लॉक! लोकल बंद, एक्सप्रेस रद्द, वाचा सर्व डिटेल्स

तांत्रिक बिघाड इतका गंभीर आहे की, मध्य रेल्वेला या मार्गावरील गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील (Main Line) जलद मार्गावर आणि काही प्रमाणात धीम्या मार्गावरही ताण वाढला आहे. या बिघाडामुळे मुंबईतील नोकरदारांचे मात्र चांगलेच हाल होणार आहेत. 

Advertisement