Central Railway: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मध्य रेल्वेवर 7 वर्षानंतर मोठा बदल; प्रवास होणार सुखकर

सध्या १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या अत्यंत मर्यादित आणि त्यांच्या वेळाही अनियमित होत्या. तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Central Railway News: मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी आणि त्यावरून होणारी ओरड लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने अखेर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्य मार्गावर सध्या धावणाऱ्या १२ डब्यांच्या १० उपनगरीय लोकल फेऱ्यांचे रूपांतर आता १५ डब्यांच्या फेऱ्यांमध्ये करण्यात आले आहे. सोमवारपासून या वाढीव क्षमतेच्या फेऱ्यांची अंमलबजावणी सुरू झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Samruddhi Accident: 'समृद्धी'वर भयंकर अपघात! अपघातग्रस्त ट्रकला कारची धडक; 6 जणांचा होरपळून मृत्यू

मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा

​गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी संघटनांकडून १५ डब्यांच्या फेऱ्या वाढवण्याची आग्रही मागणी केली जात होती. विशेषतः सीएसएमटी ते कर्जत, अंबरनाथ आणि बदलापूर या पट्ट्यातील प्रवाशांना दररोज जीवघेण्या गर्दीचा सामना करावा लागतो. सध्या १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या अत्यंत मर्यादित आणि त्यांच्या वेळाही अनियमित होत्या. तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

रेल्वे प्रशासनाने नवीन फेऱ्या वाढवण्याऐवजी अस्तित्वात असलेल्या १२ डब्यांच्या गाड्यांची क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे. यामुळे एकूण फेऱ्यांच्या संख्येत फारसा बदल झालेला नसला, तरी प्रत्येक गाडीची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. आगामी काळात कसारा मार्गावरही १५ डब्यांच्या गाड्या सुरू करण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ही वाढ पुरेशी आहे का, हा प्रश्न कायम आहे.