Nagpur News: FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना धक्का! 'त्या' आदेशाने अडचणी वाढल्या; न्यायालयात आव्हान

गुटखा विक्रेत्यांविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा आदेशही त्यांनी दिला. तुकाराम मुंडेंच्या याच आदेशाला आता नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

FDA Tukaram Munde News:  महाराष्ट्राचे धडाकेबाज अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही अशी कठोर भूमिका घेत अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत गुटखा विक्रेत्यांविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा आदेशही त्यांनी दिला. तुकाराम मुंढेच्या याच आदेशाला आता नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

Rain News: तुफान पाऊस बरसणार! मुंबईसह 4 जिल्ह्यात रेड अलर्ट, कुठे कुठे शाळांना सुट्टी? हेल्पलाईन क्रमांक जारी

तुकाराम मुंडेंच्या आदेशाला कोर्टात आव्हान

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत प्रतिबंधित व्यवहारात असलेल्या व्यक्तीविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाच्या वैधतेला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात अन्न व औषध विभागाचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, अन्न औषध प्रशासन आयुक्त आणि पोलिस महासंचालक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

- या आदेशाविरोधात बुलढाणा येथील आरोपी मो. इकबाल मो. शफी यांनी याचिका दाखल केली आहे. मुंढे यांचा आदेश मनमानी, एकतर्फी आणि अधिकाराचा दुरुपयोग करणारा आहे. असा आदेश जारी करण्याचा कोणत्याही कायद्यात अधिकार नाही असा याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे. हा वादग्रस्त आदेश अवैध ठरवून रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. 

- राज्यात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत गुटखा, पान मसाला, आदी खाद्यपदार्थाचे उत्पादन, साठा वितरण व विक्रीवर प्रतिबंध आहे. तुकाराम मुंढे यांनी या कायद्यांतर्गत १२ जून २०२६ रोजी वादग्रस्त आदेश जारी करून प्रतिबंधित खाद्यपदार्थाचे उत्पादन, अर्थसहाय्य, पुरवठा व परिवहन करणारे गोदाम संचालक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते आदिविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास सांगितले आहे.

नक्की वाचा - Jalgaon News: दीड कोटींची रोकड, अर्धा किलो सोनं, मुद्रांक अधिकाऱ्याच्या घरात घबाड, बडा अधिकारी वाईट फसला