- जळगावच्या जिल्हा मुख्य मुद्रांक अधिकारी किरण चौधरी यांच्या घरी एसीबीने छापा टाकला
- या कारवाईत दीड कोटी रुपयांची रोकड, अर्धा किलो सोनं आणि अनेक महत्वाचे कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली
- या छाप्यात १ कोटी ५३ लाख रुपये रोकडसह सोने चांदी सापडली आहे
मंगेश जोशी
सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अनेक बडे अधिकारी तर लाच घेताना रंगे हात पकडले गेले आहेत. लाचेच्याच पैशातून या अधिकाऱ्यांनी मोठी माया गोळा केल्याचेही समोर आले होते. असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. जिल्हा मुख्य मुद्रांक अधिकाऱ्याच्या घरावर एसीबीने धाड टाकली. या धाडीत जी काही माय सापडली ती पाहून एसीबीच्या अधिकाऱ्यांचे ही डोळे फिरले आहेत. ही कारवाई जळगावमध्ये करण्यात आली. या धाडीनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या धाडीत एसीबी अधिकाऱ्यांच्या हाती काय काय लागलं हे आपण पाहणार आहोत.
जळगावमध्ये मध्यरात्री एसीबीच्या पथकाची धडक कारवाई केली. जळगावच्या विष्णूनगर मधील साईप्रभा सोसायटीमध्ये मध्यरात्री एसीबीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर तिथं एका घराची झाडाझडती सुरु झाली. हे घर अकोल्यात नोकरी करत असलेल्या जिल्हा मुख्य मुद्रांक अधिकारी किरण चौधरी याचं होतं. या धडक कारवाईत एसीबीने कोट्यवधींचं घबाड जप्त केलं आहे. सरकारी अधिकाऱ्याच्या घरी कोट्यवधीची माया सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धाडी एसीबीच्या हाती दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. शिवाय अर्धा किलो सोनं ही एसीबीला सापडलं आहे. ऐवढचं नाही तर अनेक महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत.

एसीबीच्या छाप्यात जे काही सापडलं ते पाहून सर्वांचेच डोळे पांढरे झाल्या शिवाय राहाणार नाही. यात एकूण 1 कोटी 53 लाख 84 हजार 630 रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. त्यात 500, 200, 100, 50 आणि 20 रुपयांच्या नोटांची बंडलांचा समावेश आहे. या शिवाय 60 लाख 57 हजार 135 रुपये किमतीचं सोनं ही सापडलं आहे. 160 ग्रॅम वजनाची सोन्याची 2 बिस्किटे ही ताब्यात घेण्यात आली आहे. 11 लाख 52 हजार 745 रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या ही मिळाल्या आहेत. 31 हजार 416 रुपये किमतीची 154 ग्रॅम चांदी ही हस्तगत करण्यात आली आहे. 62 लाख 13 हजार 376 रुपये किमतीची जमिनीची कागदपत्र ही या छाप्यात आढळली आहेत. दुपारी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 10 तास ही कारवाई सुरू होती.
या प्रकरणी किरण चौधरी यांना ताब्यात घेतल्यावर चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अकोल्यातल्या कारवाईनंतर त्याचं जळगावमधलं घर सीलबंद करण्यात आलं होतं. मात्र दोनच दिवसात याच घरात मध्यरात्री घुसलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. त्यानंतर आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. प्राथमिक तपासात हे दोघेही किरण चौधरी यांच्या नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. ते कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या उद्देशाने घरात गेले होते, याचाही तपास सुरू आहे.माजी आमदार अमोल मिटकरी त्यांनी म्हंटलं आहे की अकोल्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. तहसील कार्यालयापासून सगळीकडे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world