Chandrapur News: 'मी भारताचा पंतप्रधान', स्वयंघोषित नेत्याची जिल्ह्यात चर्चा, प्रशासनाकडे केली अजब मागणी!

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील रहिवासी आहे. त्यांनी पंतप्रधान पदावर नियुक्ती झाल्याचा दावा करत अंगरक्षणासाठी पिस्टल व प्रमाणपत्र घरपोहोच देण्याची मागणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर:

Chandrapur News:  आत्तापर्यंत तोतया पोलीस अधिकारी, तोतया आयपीएस अधिकारी बनून लोकांना फसवल्याचे प्रकार अनेकदा ऐकले असतील. मात्र चंद्रपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपुरात एक व्यक्ती चक्क स्वयंघोषित पंतप्रधान म्हणून फिरत आहे. तसेच त्याने अंगरक्षणासाठी पिस्टल व प्रमाणपत्र घरपोच देण्याची मागणीही केली आहे. 

"मी स्वयंघोषित पंतप्रधान"

एका युवकाने स्वतःला भारताचा स्वयंघोषित पंतप्रधान संबोधत थेट पोलिस आयुक्तांना अर्ज सादर केल्याची घटना समोर आली आहे. महादेव गुलाब आसेकर असे अर्जदाराचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील रहिवासी आहे. त्यांनी पंतप्रधान पदावर नियुक्ती झाल्याचा दावा करत अंगरक्षणासाठी पिस्टल व प्रमाणपत्र घरपोहोच देण्याची मागणी केली आहे.

Washim News : ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या कारला अपघात; ट्रकची जोरदार धडक

आसेकर यांनी दिलेल्या अर्जात, मी स्वयंइच्छेने भारताच्या पंतप्रधानपदावर नियुक्त झालो आहे. त्यामुळे पंतप्रधानांना मिळणारे प्रमाणपत्र तसेच अंगरक्षणासाठी पिस्टल तत्काळ देण्यात यावे,अशी मागणी नमूद केली आहे. यापूर्वी पोलिस स्टेशन वरोरा येथे अर्ज दिला, मात्र वरिष्ठ अधिकारी मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अर्जात पुढे वरोरा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच संबंधित पदावर वर्षा तंदूलकर यांची पोलिस निरीक्षक (ठाणेदार) म्हणून नियुक्ती करावी, अशीही मागणी अर्जदाराने केली आहे. त्याने आपल्या गाडीवर पंतप्रधान (PM) भारत सरकार अस स्टीकर सुध्दा चिपकवलेल आहे. या अर्जाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त होत आहे. पोलिसांकडून अर्जाची नोंद घेण्यात आल्याची माहिती असून या प्रकरणाकडे विनोदी नजरेतून पाहिले जात आहे.

Advertisement

Trending News: चित्त्यांचा 'शाही' थाट! मटणावरचा दररोजचा खर्च ऐकून हैराण व्हाल, सरकारने मांडला हिशोब

कोण आहे ही व्यक्ती?

महादेव आसेकर यांना शेतीतून पाच कोटी मिळाल्याचे समजते. यानंतर त्यांनी वरोरा येथे आलिशान घर खरेदी केले. तसेच फार्च्यूनर कार घेतली. पूर्वी तो 'मी कॅबिनेट दर्जा माणूस असल्या'चे सांगत होता. नंतर काही दिवस कारवर 'व्हीआयपी पर्सन' असे लिहिले होते. आता तर चक्क स्वतःला स्वयंघोषित पंतप्रधान म्हणून मिरवत आहे. तो सोशल मीडियावरही या बाबी व्हायरल करतो.