Washim News : वाशीम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका कार्यक्रमातून परतत असताना दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ टिप्पर (ट्रकने) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात खासदारांच्या वाहनाचं नुकसान झालं आहे.
सुदैवाने खासदार संजय देशमुख हे सुखरूप असून त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे. अपघातानंतर त्यांना दिग्रस येथील म्हात्रे रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world