Viral Video: ताडोबाचे जंगल, ते तिघे अन् नैसर्गिक स्विमिंग पूल! 'या' Video तून निसर्गाच्या रुपाची अनुभूती

हे दुर्मीळ आणि मनमोहक दृश्य प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार जतीन पटेल यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

मनिष रक्षमवार 

मान्सूनचे आगमन झाले आहे. पण अनेक ठिकाणी मान्सूनची प्रतिक्षाच आहे. त्यामुळे उन्हाचे चटके अजून ही काही भागात सहन करावे लागत आहेत. माणसांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. त्याला प्राणी ही अपवाद नाहीत. अशा वेळी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातून असाच एक मस्त आणि तितकाच मजेशिर व्हिडीओ समोर आला आहे. उन्हाने त्रस्त झालेले वाघाचे बछडे नैसर्गित स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त जलक्रीडा करत आहे. एका पर्यटकांने हा  क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. युजर्सनी यावर चांगल्या कमेंट ही केल्या आहेत.  
 
चंद्रपूर  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील केसलाघाट, सोमनाथ गेटजवळील हा व्हिडीओ आहे. इथं नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये वाघाच्या बछड्यांनी मनसोक्त जलक्रीडा करताना पर्यटकांचे लक्ष वेधले. पावसाळ्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक जलसाठ्यात बछड्यांनी खेळत, डुंबत आणि एकमेकांसोबत धम्माल करत घालवलेले क्षण पाहून वन्यजीवप्रेमी भारावून गेले होते. त्यातील पर्यटकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 

नक्की वाचा - Nasarapur Pune: नसरापूर प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? वाचा संपूर्ण टाईमलाइन एका क्लिकवर

हे दुर्मीळ आणि मनमोहक दृश्य प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार जतीन पटेल यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. त्यांच्या छायाचित्रांमधून ताडोबातील वन्यजीवनाचे नैसर्गिक आणि आकर्षक रूप पुन्हा एकदा समोर आले आहे. सध्या हे छायाचित्र आणि व्हिडिओ वन्यजीवप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ताडोबातील वाघांचे नैसर्गिक अधिवास आणि संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हाच खरा निसर्गाचा अविष्कार अशा पद्धतीच्या कमेंट केल्या आहे. तर या दृष्यासाठी काहींना आभार ही मानले आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Pune Nasarapur Case: ब्रेकिंग! नसरापूरच्या नराधमाला फाशी; 2 महिन्यात न्याय मिळाला

उन्हाळा संपला आहे. असं असलं तरी विदर्भात मात्र उन्हाचा तडाका अजून ही आहे. ताडोबामध्ये अनेक वन्यजिव आहे. त्यांनाही या उन्हाचा फटका बसत आहेत. त्यामुळे पाणवठ्याजवळ हे वन्यप्राणी येतात. असचं एक दृष्य सध्या पाहायला मिळत आहे. वाघाचे बछडे एकत्र पाणवठ्या जवळ आले आहेत. ते तिथं एकच धम्माल करताना दिसत आहे. पाण्याचा डोह त्यांच्यासाठी जणून स्विमिंग पूल बनला आहे. हा पाण्याचा गारवा त्यांच्यासाठी जणू स्वर्ग सुख म्हणायला हवा. उष्णतेपासून त्यांना तेवढाच दिलासा यामुळे मिळाला आहे.