- चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाढत असलेल्या मानव-व्याघ्र संघर्षामागे तीव्र उष्णतेचा प्रभाव आहे
- सिंदेवाहीतील वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आलाय
- चंद्रपूरमध्ये तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे वाघांमध्ये हायपरथर्मिया वाढते
अभिषेक भटपल्लीवार
वाघ आक्रमक होत आहेत. त्यांच्यात चिडचिड होत आहेत. गेल्या काही दिवसात वाघांनी मानवावर हल्ले केल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाढत असलेल्या मानव-व्याघ्र संघर्षामागे केवळ 'नरभक्षक' प्रवृत्ती नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तीव्र उष्णतेमुळे वाघांच्या शरीरावर आणि वर्तनावर होणारे परिणाम कारणीभूत असल्याचे मत वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही येथे वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने राज्य हादरले आहे. मात्र, याकडे केवळ ‘नरभक्षक वाघ' म्हणून पाहणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी तथा जलद बचाव गटप्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या निरीक्षणानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात यंदा तापमानाने 45 ते 47 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. या तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये 'हायपरथर्मिया' (अतिउष्णतेमुळे निर्माण होणारा ताण) वाढतो आहे. वाघासारख्या मोठ्या मांसाहारी प्राण्यांमध्ये 'थर्मल स्ट्रेस' वाढल्यास ते अधिक चिडचिडे, अस्वस्थ आणि आक्रमक होतात. त्यातूनच ते समोरच्यावर हल्ला करत असतात असं त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Kala Dhaga: 'या' 3 राशींच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा! होईल मोठे नुकसान
उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटतात. त्यात तापमान असह्य झाल्याने वाघ पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र आणि हिंसक होताना दिसत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसात वाघाचे हल्ला वाढल्याचे आपण पाहीले आहेत. चंद्रपूरमध्ये तर चौघांवर वाघाने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर स्थानिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. वाघांचा बंदोबस्त झाला पाहीजे अशी मागणी ही समोर आली. तसा हा संघर्ष इथल्या लोकांसाठी नवा नाही. पण उन्हाळ्यात अशा घटना वाढल्या आहेत.
नक्की वाचा - DMart News: डीमार्टमध्ये ‘या' वस्तू कधीच का मिळत नाहीत? समोर आले मोठे कारण
त्या मागचे शास्त्रीय कारण ही आता वन तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. वाढत्या उन्हामुळे जंगलातील पाण्याचे साठे सुकले आहेत. असह्य उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पाण्यासाठी वाघ गावांच्या वेशीवर येत आहेत. वाघांवर अतिउष्णतेचा ताण निर्माण होतो. यामुळे शांत राहणारा हा वन्यजीव कमालीचा अस्वस्थ आणि आक्रमक बनत आहे. यातूनच अचानक समोर येणाऱ्या मानवावर हल्ले वाढले असून, केवळ वाघाला दोष न देता या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world