जाहिरात

Chandrapur News : वाघोबा पाहायला गेले अन् 'मामा' बनवलं; ताडोबाचा प्लान करत असेल तर ही चूक करू नका! 

वाघाची एक झलक बघण्यासाठी पर्यटक कितीही रक्कम मोजण्यासाठी तयार असतात.

Chandrapur News : वाघोबा पाहायला गेले अन् 'मामा' बनवलं; ताडोबाचा प्लान करत असेल तर ही चूक करू नका! 

अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी

Chandrapur's Tadoba-Andhari Tiger Reserve : सध्या अनेक घरांमध्ये नाताळ आणि नववर्षाला फिरायला कुठे जायचं याचा प्लान आखला जात आहे. तर अनेकांनी आधीच याचं ऑनलाइन बुकिंग केलं आहे. मात्र हे बुकिंग तुम्ही योग्य संकेतस्थळावर जाऊन केलंय की नाही याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. चंद्रपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

चंद्रपूरच्या ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वेबसाईटच्या नामसाधर्म्याचा गैरवापर करत पर्यटकांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. आतापर्यंत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी चालू वर्षातील दोन तारखांना दोन वेगवेगळ्या तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Nashik News : 14 व्या प्रसुतीनंतर 45 वर्षीय महिलेचं घृणास्पद कृत्य उघड; भयंकर 'व्यवसाय' पाहून नाशिककर हादरले

नक्की वाचा - Nashik News : 14 व्या प्रसुतीनंतर 45 वर्षीय महिलेचं घृणास्पद कृत्य उघड; भयंकर 'व्यवसाय' पाहून नाशिककर हादरले

ताडोबात राजकीय नेते, सेलिब्रेटी, सामाजिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती व्याघ्र दर्शनासाठी येत असतात. वाघाची एक झलक बघण्यासाठी पर्यटक कितीही रक्कम मोजण्यासाठी तयार असतात. अनेकदा जंगल सफारीची बुकिंग ही पर्यटकांना मिळत नाही. त्यामुळेच पर्यटकांना बनावट वेबसाईटच्या माध्यमातून लुबाडण्याचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. ऐनवेळी बनावट वेबसाईटवर बुकिंग केल्यानंतर ताडोबा जाण्याची संधी मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या पर्यटकांनी या प्रकाराची प्रकल्प व्यवस्थापनाकडे तक्रार केली आहे. 

गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जवळपास १३ पर्यटकांची अशी फसवणूक झाली असून यासंदर्भात पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असला तरी सायबर तंत्राच्या माध्यमातून हा तपास केला जाणार असल्याने यात बरीच गुंतागुंत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी सोबत व्हॉट्सअप संदेश, बुकिंग व्हाउचर, पेमेंट स्क्रीनशॉट व आवश्यक पुरावे देण्यात आले आहेत.

https://mytadoba.mahaforest.gov.in/

ही ताडोबा टायगर सफारीची अधिकृत वेबसाईट असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com