प्रांजल कुलकर्णी: नाशिक: 'मला मंत्रिपदाची हाव नाही, हा प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे, असे म्हणत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मी आमदार म्हणून हाऊसमध्ये बोलणार तसं रस्त्यावर पण बोलणार आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार असल्याची मोठी घोषणा केली. नाशिकमधील संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते.
काय म्हणाले छगन भुजबळ?
येवला, लासलगाव मतदार संघामध्ये कोणीतरी गेल्यासारखी दुखासारखी अवस्था आहे. मी काल समजावण्याचे, धीर देण्याचे खूप प्रयत्न केले. माझ्याविरोधात मतदारसंघात काम केलेलेही विचारतात साहेबांचं असं कस झालं? देशभरातून, फोन मेसेजस येत आहेत. सर्वांची मागणी आहे, तुम्ही आमच्या शहरात, जिल्ह्यात, राज्यात या. कधीकधी शांत असलेली माणसं पेटून उठतात. तसाच प्रकार राज्यामध्ये दिसत आहे. मात्र पेटून उठले तरी आपण पेटवापेटवी करायची नाही
वर्गीयांप्रमाणे मराठे लोकही आहेत. निवडणुकीत माझे सारथ्य करणारे मराठेच होते. महात्मा फुलेंसोबतही ब्राम्हणच होते. महिलांच्या शाळेला विरोध
करणारे तुमच्यामधलेही होते आणि कट्टरवादीही होते, आपल्याला जागा देणारेही ब्राम्हण होते. त्यामुळे सगळे आपले दुश्मन नाहीत. अनेकजण कोत्या मनोवृत्तीचे आहेत. जे आम्हाला संपवायला निघालेत, त्यांना आमचा विरोध आहे. ज्यांना हे समतेचे चक्र उलटं फिरवायचे आहे त्यांना आम्ही विरोध करतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा विरोधक नाही..
'आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत. मागासवर्गीय मंडळी हळूहळू पुढे येतील, त्यांना आरक्षण द्या. मराठा आरक्षणाला कधीही विरोध केला नाही. तीन वेळा हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर छगन भुजबळाने पहिला हात वरती केला. ़ आम्ही मराठाविरोधी नाही. आमच्यावर कुरघोडी करणारे जे आहेत, त्यांना विरोध करणे गरजेचे आहे. त्यांना समजावून सांगायला पाहिजे, पुन्हा बीड होता कामा नये. आमदारांची घरे जाळा, हॉटेल जाळा, असं व्हायला नको. त्याच्याविरोधात कोणी बोलले नाही. त्यावेळी घेतलेल्या लाखोंच्या मेळाव्याने आधार निर्माण झाला. एक है तो सेफ है अशी भावना झाली.
रस्त्यावर उतरणार, राज्यात जाणार..
'मंत्री नाही त्याचा आश्चर्यचा धक्का बसला पण तुम्ही दुःखी होऊ नका.. शायरी म्हणतायत.. हौसेला बुलंद रखो.. अनेक वर्षे आहेत, निवडणुका संपल्या नाहीत. महापालिका, पंचायत समिती आहे. आमचे ईतर ओबीसी नेते मंत्री झालेले आहेत पण मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. मी आमदार म्हणून हाऊसमध्ये बोलणार तसं रस्त्यावर पण बोलणार आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे,' अशी घोषणा भुजबळांनी केली.
'छगन भुजबळ मंत्रिमंडळात हवेत असा फडणवीस यांचा आग्रह होता. प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनीही प्रयत्न केले. जो न्याय इतरांना, तो मला का नाही? हे अवहेलना केल्याचं शल्य मनाला डाचतयं. मी उद्या परवा मुंबईला जाणार आहे. सर्वांशी चर्चा करणार आहे. देशातील राज्यातील सर्वांशी चर्चा करुन आपल्याला पाऊल उचलावे लागेल. घाईघाईत नाही विचारपूर्वक निर्णय घेईन. त्यावेळी तुमची साथ मला पाहिजे,' असं आवाहन त्यांनी केले.
(नक्की वाचा: Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे)