'बायकोला गळ्यातील पोत घ्यायचीये', 93 वर्षांच्या वृद्धाने पिशवीत हात घातला अन्...; अंगावर काटा आणणारा Viral Video

मोठ्या मुलाच्या मृत्यूमुळे दोघेही खचले आहेत. त्यात दुसऱ्या मुलाच्या दारूच्या व्यसनापायी ते घराबाहेर असतात. मात्र अशा परिस्थितीत दोघांचं एकमेकांवरील प्रेम पाहून डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

पती-पत्नी यांच्यामधील नातं अतूट असतं. लग्नावेळी बांधलेली गाठ आयुष्यभर अशीच घट्ट राहावी असं वचन एकमेकांना दिलं जातं. सुख-दु:खात एकमेकांना साथ देतात. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपला नवरा किंवा बायको सोबत असवी अशी इच्छा असते. दरम्यान सोशल मीडियावर एक आजी-आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 93 वर्षांचे आजोबा आपल्या पत्नीला गळ्यातील पोत घेण्यासाठी घेऊन जातात.

पैसे मागून करतात गुजराण...

मोठ्या मुलाच्या मृत्यूमुळे दोघेही खचले आहेत. त्यात दुसऱ्या मुलाच्या दारूच्या व्यसनापायी ते घराबाहेर असतात. मात्र अशा परिस्थितीत ते दोघं एकमेकांना सोबत घेऊन आहेत. शहरात फिरून जे पैसे येतील त्यात गुजराण करतात. मात्र अशाही परिस्थिती ते आपल्या पत्नीची काळजी घ्यायला तिची इच्छा पूर्ण करायचे विसरले नाही. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दहा दहा रुपये जमा करून ते ज्वेलरीच्या दुकानात आले आणि बायकोची इच्छा पूर्ण केली. त्यावेळी दुकानदाराने त्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली त्याचं मोठं कौतुक होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंठा तालुक्यातील अंभोरा जहागीर येथील वृद्ध दाम्पत्य नुकतंच छत्रपती संभाजीनगर येथील एका ज्वेलरी दुकानात गेले होते. दुकानात प्रवेश करताच कर्मचाऱ्यांना वाटले की हे वृद्ध पैसे मागण्यासाठी आले असावेत. मात्र, ९३ वर्षीय निवृत्ती सखाराम शिंदे यांनी आपल्या पत्नीसाठी पोत खरेदी करायची आहे, असे सांगितले. 

वृद्ध पतीचं आपल्या पत्नीवरील प्रेम पाहून ज्वेलरी दुकानाच्या मालकाने त्यांना खास पोत भेट म्हणून दिली आणि केवळ वीस रुपये ‘आशीर्वाद' म्हणून घेतले. या सौंदर्यपूर्ण क्षणाचा व्हिडिओ दुकानाने सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला 93 वर्षीय बाबांचं त्यांच्या बायकोवरील प्रेम पाहण्यासाठी मिळाले' असं कॅप्शन दिलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News: मुलगी झाली म्हणून विवाहितेला 15 दिवस उपाशीपोटी डांबलं, पुढे जे काही घडलं ते...

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून दहा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो शेअर, लाईक्स व कमेंट्सच्या माध्यमातून नेटिझन्सनी या दांपत्याच्या प्रेमाची दाद दिली आहे. या घटनेतून शेतकरी कुटुंबातील वृद्ध दांपत्य आणि व्यावसायिक यांच्यात घडलेला हा भावनिक संवाद सर्वांनाच भावला असून अनेकांनी यावर प्रेमळ प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Advertisement

व्हिडिओची लिंक पाहण्यासाठी इथं क्लिक करा...

या दांपत्याचे नाव निवृत्ती सखाराम शिंदे व शांताबाई निवृत्ती शिंदे असून ते अंभोरा जहागीर (ता. मंठा, जि. जालना) येथील रहिवासी आहेत. हे वृद्ध दांपत्य नेहमी एकमेकांसोबत असतात. त्यांचा मुलगा दारू पितो आई वडिलांना सांभाळत नाही. निवृत्ती सखाराम शिंदे व शांताबाई निवृत्ती शिंदे हे दोघे ही संभाजीनगर शहरात भिक्षा मागून उदर निर्वाह करतात. गावाकडे कधी तरी येतात, मात्र मुलगा सांभाळत नसल्याने दोघे ही नेहमी बाहेर पैसे मागत फिरत असतात,अस गावाकऱ्याचं म्हणणं आहे.