T. Raja Singh Controvercial Speech: छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीवरून वादाची ठिणगी पडली आहे. तेलंगणातील आमदार टी-राजा सिंह यांनी शहरात आयोजित एका सभेत बोलताना अत्यंत आक्रमक आणि प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. "औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका आणि त्या जागी मुतारी बांधा," असे विधान त्यांनी भरसभेत केले. या विधानामुळे शहरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
टी राजा सिंह यांचे वादग्रस्त विधान
छत्रपती संभाजीनगर येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेने आयोजित केलेल्या सभेला संबोधित करताना आमदार टी. राजा सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. टी. राजा सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली. तसेच औरंगजेबाची कबर बांधून त्या जागी मुतारी बांधावी असे वादग्रस्त विधानही केले. तुम्ही हे केल्यास, हिंदू तुम्हाला नेहमीच सत्तेवर निवडून देतील. ते तुम्हाला कधीही विसरणार नाहीत," असंही ते म्हणाले.
Ashok Kharat Case: मोठी बातमी! महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार? पोस्टने खळबळ
"देवाभाऊ, इतिहास घडवण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते. हिंदू समाज तुम्हाला संधी देत आहे. हिंदू बांधवांची मागणी आहे की औरंगजेबाची कबर उखडून टाकावी. तुम्हाला कुणाची भिती आहे. औरंगजेबाची कबर पाडायला किती लाख लोकांची गरज आहे, तुम्ही सांगा. मी लोक घेऊन येईन. आम्ही उभे राहू, तुम्ही फक्त बुलडोझर घेऊन या. समोर येईल त्या औरंगजेबांच्या औलादींचा खात्मा करु," असे चिथावणीखोर वक्तव्यही टी. राजा यांनी केले आहे.
दरम्यान, यावेळी "टी. राजा सिंग यांनी हिंदू महिलांना धर्मप्रसार करण्याचे आवाहन केले. त्यांनी सभेत उपस्थित असलेल्या भगिनींना दर आठवड्याला किमान एक तास धर्मप्रसारासाठी देण्याचे आवाहन केले. सर्वप्रथम, आपल्या नातेवाईकांना हिंदुत्वाबद्दल सांगा. त्यांना लव्ह जिहादबद्दल सांगा. तुमची मुलगी लहान असली तरी, तिला लव्ह जिहादबद्दल आणि भगिनी व मुली कशा अडकल्या आहेत याबद्दल सांगा," असं ते म्हणाले.
VIDEO : गुडी पाडवा शोभायात्रेत चमकोगिरी नडली; पोलिसांनी तरुणीची शायनिंग गर्दीसमोरच जिरवली!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world