Chhatrapati Sambhajinagar Crime: कर्जबाजारीपणाला कंटाळून 26 वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आपली जिवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. चोरीला गेलेला ट्रक पोलिसांना सापडला नाही. मात्र, त्यानंतरही कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने आर्थिक संकटात अडकल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. मृत्यूआधी त्याने हातात औषधाची बॉटल घेऊन सेल्फी काढली अन् सुसाईड नोट लिहून मृत्यूला कवटाळले.
Nashik Crime: ऑफिसमधून टॅब चोरल्याची तक्रार, फिर्यादीच झाला आरोपी, 121 नको ते व्हिडिओ सापडले
हातात बॉटल, हसरा सेल्फी अन् आयुष्याचा शेवट!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरीला गेलेला ट्रक पोलिसांना सापडला नाही. मात्र, त्यानंतरही कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने दीड वर्षापासून कर्जबाजारी झालेल्या २६ वर्षीय संदेश दिनकर गवळी याने पोलिसांविरोधात सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. बुधवारी रात्री ही घटना घडली.
संदेश टँकरचा व्यवसाय करत होता. आई, वडील, दोन भाऊ, बहिणीसह तो जय भवानीनगरमध्ये राहत होता. गुरुवारी सायंकाळी कुटुंब एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्याने सुसाईड नोट लिहून, विषारी औषधसोबत हसरे सेल्फी काढले. तसेच हेच फोटो मित्रांना व्हाट्सएपवर पाठवून विष घेत जीवनयात्रा संपवली. चिठ्ठीमध्ये त्याने पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप
"मी संदेश दिनकर गवळी आज माझी जिवनयात्रा संपवत आहे, त्यासाठी जबाबदार चिकलठाणा पोलीस प्रशासन आहे, ज्यांनी चोरांशी संगनमत करुन माझा ट्रक चोरला, चोरांना लाच घेऊन साथ दिली व हे अपयश माझ्या माथी मारले. यासाठी दुसरे कोणी जबाबदार नसून सामन्य नागरिकांच्या सेवेसाठी नेमलेले अधिकारी आहेत, " असा आरोप या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
Bhandara News: पंधरा दिवसात 2 बळी, मुलांच्या शाळा बंद, घराबाहेर पडणे मुश्किल.. भंडाऱ्यात काय घडतंय?
"माझा चोरी गेलेला ट्रक ज्याचा नंबर MH 46 F.2797 असून तो दिनांक 6. 10. 2024 रोजी चोरीला गेला. त्यावर कोटक बँकेचे लोन असून इन्सुरन्स नसल्याने पैसे मला भरावे लागत आहेत. तसेच शेवटच्या क्षणासाठी लागणाऱ्या खर्चासाठी माफी असावी. माझ्या आईची काळजी घ्यावी. तुम्ही दिलेल्या जिवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, मला माफ करं," असंही या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे.