Chhatrapati Sambhajinagar Crime: दुचाकी पार्किंगच्या वादातून गर्भवती महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या मारहाणीत गर्भवती महिला जखमी झाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच चौघांना अटक करण्यात आली आहे.
पार्किंगचा वाद, दांपत्याला बेदम मारहाण..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दुचाकी पार्किंगवरून छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज परिसरात हातगाडीचालकांच्या टोळक्याने दुचाकीस्वार दांपत्याला जबर मारहाण केली. त्यानंतर पती-पत्नीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जखमी महिला ५ महिन्यांची गर्भवती आहे. टोळक्याने दुचाकीस्वाराला बंद असलेल्या शहागंज पोलिस चौकीच्या आवारात नेऊन मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून ४ जणांना अटक करण्यात आली.
Ratnagiri News: महिला तलाठी ACBच्या जाळ्यात! तहसील कार्यालयामध्येच रंगेहाथ पकडलं; टीप मिळाली अन्...
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील किराण चावडी चौकीजवळ हे दांपत्य फळ खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी फळाच्या गाडीजवळ दुचाकी पार्क केली. याच पार्किंगच्या वादातून त्यांचा टोळक्याशी वाद झाला, या वादानंतर टोळक्याने पती- पत्नीवर हल्ला चढवला. ज्यामध्ये दोघांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.
हिंसाचार प्रकरण: 206 जणांविरोधात गुन्हे दाखल
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात एका किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या हिंसाचार प्रकरणी दोन्ही गटातील एकूण २०६ जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून १० बेवारस दुचाकीही जप्त केल्या आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, गावात 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवले जात आहे. मटण विकत घेण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन गट आमने सामने आले होते.