जाहिरात

Maharashtra Politics: महायुतीला मोठा धक्का! राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; जागा वाटपावरुन नाराजी

जागावाटप किंवा निवडणूक रणनीतीबाबत साधी चर्चा करण्यासाठी कोणाचाही फोन आला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आपली वेगळी भूमिका घेण्याचे ठरवले आहे.

Maharashtra Politics: महायुतीला मोठा धक्का! राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; जागा वाटपावरुन नाराजी

Chhatrapati Sambhajinagar Election 2025:  राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १०० वॉर्डांसाठी रविवारी (२८ डिसेंबर) उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिली आहे. महायुतीमधील अंतर्गत वादातून हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

​बैठकांपासून दूर ठेवल्याने संताप

​गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या सातत्याने बैठका सुरू होत्या. मात्र, या कोणत्याही बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नाही. जागावाटप किंवा निवडणूक रणनीतीबाबत साधी चर्चा करण्यासाठी कोणाचाही फोन आला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आपली वेगळी भूमिका घेण्याचे ठरवले आहे.

Solapur News : सोलापुरात रक्ताचा सडा! महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवाराची हत्या

​महायुतीवर घराणेशाहीचा आरोप

​राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी महायुतीवर सडकून टीका केली आहे. महायुतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर घराणेशाही सुरू असून, आपल्याच भावाला किंवा बहिणीला तिकीट मिळवून देण्यासाठी स्पर्धा लागली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशा वातावरणात पक्षाची गळचेपी होत असल्यानेच स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याची संधी

​स्वतंत्र निवडणूक लढवण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस एक संधी म्हणून पाहत आहे. "आम्ही जरी महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र लढत असलो, तरी याद्वारे पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याची ही एक मोठी संधी आम्हाला मिळाली आहे," असे देशमुख यांनी सांगितले. या निर्णयामुळे आता महापालिका निवडणुकीत तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

( नक्की वाचा : Pune News : पुण्यात लोकशाहीचा 'आंदेकर' पॅटर्न: तुरुंगातून बाहेर आला आणि उमेदवारी अर्ज भरला, धक्कादायक Video )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com