Chhatrapati Sambhajinagar ZP Election : निवडणुकीत एका मताला किती किंमत असते याचं ज्वलंत उदाहरण छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद निवडणुकीत एक उमेदवार चक्क एक मताने निवडून आला आहे. (Maharashtra Zilla Parishad Election Results 2026)
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात अपक्ष उमेदवार सचिन गरड 1 मताने विजयी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते ईव्हीएम मतमोजणीत १७ मतांनी आघाडीवर होते. पण पोस्टलमधून १६ मतदान झालं. आणि सगळे मतदान शिवसेना शिंदे यांच्या उमेदवार यांना मिळालं. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला एक मत कमी पडल्यामुळे सचिन गरड विजयी झाले आहेत.
१ मताने विजयी झालेले सचिन गरड याबाबत म्हणाले, पंचायत समितीतील दोन्ही सदस्य निवडून आले असते तर अधिक आनंद झाला असता. ही माझी तिसरी निवडणूक आहे. गेल्या निवडणुकीत ११०० मतांनी निवडून आलो. मात्र यंदाच्या निवडणुकीतील निकाल माझ्यासाठी शिकण्यासारखा आहे. मतदार राजा काय असतो हे यातून स्पष्ट होतं. एक मत म्हणजे लोकशाहीचा विजय आहे असं वाटतंय.
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निकाल : एकूण ९ पंचायत समिती -
१)छत्रपती संभाजीनगर एकूण (२०)
भाजप : 0
शिवसेना : 4
शिवसेना UBT: 1
NCP : 0
MIM : 3
काँग्रेस 2
इतर : 2
२)पैठण तालुका (१८)
भाजप : 0
शिवसेना : 13
शिवसेना UBT: 3
NCP : 2
इतर :
३)गंगापूर तालुका (१८)
भाजप : 4
शिवसेना : 1
शिवसेना UBT:1
NCP : 2
इतर : 1
४)वैजापूर तालुका (१६)
भाजप : 2
शिवसेना : 4
शिवसेना UBT: 3
NCP : 4
NCP SP : 1
Other : 2
५)कन्नड तालुका (१६)
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 2
NCP :
६)खुलताबाद तालुका (६)
भाजप : 3
शिवसेना :
शिवसेना UBT: 1
NCP : 2
७)फुलंब्री तालुका (८) :
भाजप : 4
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP :
काँग्रेस : 1
८)सिल्लोड तालुका (१८)
भाजप : 5
शिवसेना : 3
शिवसेना UBT:
NCP :
९)सोयगाव तालुका (६) :
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 0
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world